Jump to content

नवमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. हिंदू महिन्यात साधारणत: दोन नवमी येतात, शुक्ल (शुद्ध) पक्षात एक आणि कृष्ण (वद्य) पक्षात एक. शनिवारी नवमी आल्यास त्यादिवशी दग्धयोग असतो.

काही महत्त्वाच्या नवम्या

[संपादन]
  • चैत्र शुक्ल नवमी - रामनवमी
  • वैशाख शुक्ल नवमी - सीता नवमी/जानकी नवमी
  • ज्येष्ठ शुद्ध नवमी - महेश नवमी (माहेश्वरी समाजाचा सण : या दिवशी माहेश्वरी समाजाची निर्मिती झाली.)
  • श्रवण शुक्ल नवमी : नकुल नवमी
  • श्रावण वद्य नवमी - गोगा नवमी
  • आश्विन शुक्ल नवमी - महानवमी
  • भाद्रपद शुद्ध नवमी - अदुःख नवमी
  • भाद्रपद वद्य नवमी - अविधवा नवमी
  • आषाढ शुद्ध नवमी - कांदे नवमी (चातुर्मास सुरू होण्याआधीचा कांदे-लसूण आणि कांद्याचे पदार्थ खाण्याचा शेवटचा दिवस); भडली नवमी.
  • कार्तिक शुद्ध नवमी - कूष्मांड नवमी. कोहळे नवमी. (महाराष्ट्राबाहेर आवळा नवमी किंवा अक्षय नवमी. या दिवशी तिकडे आवळी भोजनाचा (आवळ्याच्या झाडाखाली बसून तयार केलेल्या व आस्वाद घेतलेल्या जेवणाचा) कार्यक्रम असतो. (आवळा देऊन कोहळा काढण्याची म्हण यावरून निघाली असेल का?)
  • माघ शुद्ध नवमी - महानंदा नवमी; गुप्त नवरात्रातला शेवटचा दिवस.
  • माघ वद्य नवमी - दासनवमी