Jump to content

चतुर्थी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चतुर्थी ही कालमापनातील अमावास्येनंतर आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणारी तिथी आहे. अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही कृष्ण(=वद्य) पक्षात येते. संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीला नुसतेच 'संकष्टी' आणि अंगारकी चतुर्थीला 'अंगारकी' म्हणायचा प्रघात आहे.

संकष्टी चतुर्थींची विशिष्ट नावे[संपादन]

  • चैत्रातल्या संकष्टीला विकट संकष्टी चतुर्थी, वैशाखात येणारीला एकदंत आणि ज्येष्ठ कृष्ण चतुर्थीला कृष्णपिंगल चतुर्थी अशी नावे आहेत.
  • आषाढातल्या संकष्टीला गजानन संकष्टी चतुर्थी म्हणतात.
  • श्रावण कृष्ण चतुर्थीला हेरंब चतुर्थी व बहुला चतुर्थी ही नावे आहेत, तर विघ्नराज चतुर्थी भाद्रपदात येते.
  • आश्विन वद्य चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी. या दिवशी करवा चौथ असतो.
  • कार्तिकातल्या संकष्टीला गणाधिप चतुर्थी हे नाव आहे.
  • मार्गशीर्षात आखुरथ चतुर्थी येते.
  • पौषातल्या संकष्टीला लम्बोदर संकष्टी चतुर्थी किंवा सकट चौथ ही नावे आहेत.
  • माघात द्विजप्रिय संकष्टी तर, फाल्गुनात भालचंद्र चतुर्थी.

विनायकी चतुर्थीची विशिष्ट नावे[संपादन]

  • भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात.
  • माघ शुक्ल चतुर्थीला तीळ चतुर्थी, कुंद चतुर्थी, वरद चतुर्थी वा तिलकुंद चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून या दिवशी गणेशजयंती असते. तिलकुंद चतुर्थीला हिंदी भाषक प्रदेशात महत्त्वाची मानतात, तिथे हिला तिलवा म्हणतात.

चतुर्थीला (आणि नवमी/चतुर्दशीला) रिक्ता तिथी म्हणतात.

हे सुद्धा पहा[संपादन]