Jump to content

महाराष्ट्रातील उपवासाचे खाद्यपदार्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उपवासाचे पदार्थ या पानावरून पुनर्निर्देशित)

धार्मिक कारणांसाठी उपवास करणे ही भारतीयांची श्रद्धा आहे, प्रथा आहे. महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिकी एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्र यासारख्या निमित्ताने त्या दिवशी उपवास करतात. कित्येकजण आराध्य देवतेनुसार आठवडयातून एकदा सोमवार, गुरुवार किंवा शनिवार या दिवशी असे उपवास करीत असतात. उपवासाच्या दिवशी काही खास पदार्थ खाण्याची परवानगी असते. रोजच्या जेवणातल्या पदार्थांपेक्षा वेगळया वस्तूंपासून बनविलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी आवडीने खाल्ले जातात.

उपवासाचे फळ

[संपादन]