द्वादशी
Appearance
द्वादशी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावास्येनंतर बाराव्या दिवशी आली तर हिला शुक्ल द्वादशी आणि पौर्णिमेनंतर बाराव्या दिवशी आली तर हिला कृष्ण द्वादशी म्हणतात.
वर्षभरातल्या काही महत्त्वाच्या द्वादश्या
[संपादन]- चैत्र शुक्ल द्वादशी - मदन द्वादशी, वामन द्वादशी (सनातन पंचांगाप्रमाणे)
- चैत्र कृष्ण द्वादशी - सेन जयंती (राजस्थान)
- ज्येष्ठ शुक्ल द्वादशी - संभाजी महाराज पुण्यतिथी
- ज्येष्ठ कृष्ण द्वादशी - निवृत्तिनाथ पुण्यतिथी
- आषाढ शुक्ल द्वादशी - वासुदेव द्वादशी
- श्रावण कृष्ण द्वादशी - संत सेना महाराज पुण्यतिथी
- भाद्रपद शुक्ल द्वादशी - श्रवण द्वादशी (त्या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास), वामनद्वादशी; वामनजयंती
- आश्विन कृष्ण द्वादशी - गोवत्स द्वादशी (वसुबारस), गुरूद्वादशी
- कार्तिक शुद्ध द्वादशी - चातुर्मास समाप्ती
- मार्गशीर्ष शुक्ल द्वादशी - अखंड द्वादशी, व्यंजन द्वादशी, धन द्वादशी (ओरिसा), मत्स्य द्वादशी
- मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी - सुरूप द्वादशी
- पौष शुक्ल द्वादशी - कूर्म द्वादशी, सांबा द्वादशी (ओरिसा)
- पौष कृष्ण द्वादशी - तिल द्वादशी
- माघ शुक्ल द्वादशी - भीष्म द्वादशी
- फाल्गुन शुक्ल द्वादशी - गोविंद द्वादशी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |