चतुर्दशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चतुर्दशी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या आदल्या दिवशी असते.

काही महत्त्वाच्या चतुर्दशी[संपादन]

 • अघोर चतुर्दशी : श्रावण कृष्ण चतुर्दशी
 • अनंत चतुर्दशी : भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनाचा दिवस)
 • छिन्नमस्ता जयंती : वैशाख शुक्ल चतुर्दशी
 • नरक चतुर्दशी (रूप चतुर्दशी) : आश्विन वद्य चतुर्दशी (दिवाळीचा पहिला दिवस)
 • नृसिंह चतुर्दशी (नृसिंह प्रकटदिन) : वैशाख शुक्ल चतुर्दशी
 • पिशाचमोचन चतुर्दशी : मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी
 • महाशिवरात्रि : माघ वद्य चतुर्दशी
 • रूप चतुर्दशी : आश्विन वद्य चतुर्दशी (दक्षिणी दिवाळी; छोटी दिवाळी)
 • रेणुका चतुर्दशी : चैत्र शुक्ल चतुर्दशी
 • वैकुंठ चतुर्दशी : कार्तिक शुक्ल चतुर्दशी. या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रियांना कार्तिकस्वामीचे दर्शन घ्यायला परवानगी असते. या दिवशी शंकराने विष्णूला सुदर्शन चक्र दिले. महाराष्ट्रात या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून लोक जेवण करतात. (महाराष्ट्राबाहेर कार्तिक शुक्ल नवमीला आवळा नवमी असते.)
 • हाटकेश्वर जयंती : चैत्र शुक्ल चतुर्दशी