सप्तमी
Appearance
सप्तमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावस्येनंतर ही साधारणपणे ७व्या दिवशी आली तर शुक्ल सप्तमी आणि पौर्णिमेनंतर सातव्या दिवशी आली तर कृष्ण सप्तमी असते.
काही विशेष सप्तम्या
[संपादन]- चैत्र कृष्ण सप्तमी - गुरू अर्जुनदेव जयंती
- वैशाख शुद्ध सप्तमी - गंगा सप्तमी, चित्रगुप्त जयंती (कायस्थ लोक मात्र, भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्त जयंती साजरी करतात.)
- विवस्वत सप्तमी : आषाढ शुद्ध सप्तमी
- आषाढ कृष्ण सप्तमी - शीतला सप्तमी (ओरिसा)
- श्रावण शुद्ध सप्तमी - संत तुळशीदास जयंती. याच दिवशी इ.स. १४९७ साली तुळशीदासांचा जन्म झाला.
- भाद्रपद शुक्ल सप्तमी - मुक्ताभरण सप्तमी, संतान सप्तमी
- कार्तिक शुद्ध सप्तमी - सहस्रबाहू जयंती
- मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी - गुरू घासीदास जयंती, नंदा सप्तमी
- पौष शुक्ल सप्तमी - गुरू गोविंददास जयंती
- पौष कृष्ण सप्तमी - रामानंदाचार्य जयंती
- माघ शुद्ध सप्तमी - रथसप्तमी. अचला सप्तमी, विधान सप्तमी किंवा (रथ)आरोग्य सप्तमी; शिवाय चंद्रभागा सप्तमी (ओरिसा), नर्मदा जयंती
- फाल्गुन कृष्ण सप्तमी - शीतला सप्तमी (ओरिसा सोडून अन्यत्र)
- रविवारी येणारी सप्तमी - रविवार सप्तमी, भानुसप्तमी, सूर्य सप्तमी
- शुक्ल पक्षात रविवारी येणारी सप्तमी - विजया सप्तमी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |