Jump to content

लिअँडर पेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिॲंडर पेस या पानावरून पुनर्निर्देशित)
लिअँडर पेस
देश भारत
वास्तव्य कोलकाता
ओरलँडो, फ्लोरिडा
जन्म १७ जून, १९७३ (1973-06-17) (वय: ५१)
गोवा
उंची १.७८ मी (५ फु १० इं)
सुरुवात १९९१
शैली उजवा; एकहाती बॅकहॅन्ड
बक्षिस मिळकत ७५,९७,५३४ डॉलर्स
एकेरी
प्रदर्शन ९९ - ९८
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७३ (२४ ऑगस्ट १९९८)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन २ फेरी (१९९७, २०००)
फ्रेंच ओपन २ फेरी (१९९७)
विंबल्डन २ फेरी (२००१)
यू.एस. ओपन ३ फेरी (१९९७)
दुहेरी
प्रदर्शन ७१४ - ३९०
अजिंक्यपदे ५५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. (२१ जून १९९९)
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१२)
फ्रेंच ओपन विजयी (१९९९, २००१, २००९)
विंबल्डन विजयी (१९९९)
यू.एस. ओपन विजयी (२००६, २००९, २०१३)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे १०
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००३, २०१०, २०१५)
फ्रेंच ओपन विजयी (२०१६)
विंबल्डन विजयी (१९९९, २००३, २०१०, २०१५)
यू.एस. ओपन विजयी (२००८, २०१५)
शेवटचा बदल: जून २०१६.


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
ऑलिंपिक
कांस्य १९९६ अटलांटा एकेरी
राष्ट्रकुल खेळ
कांस्य २०१० दिल्ली पुरुष दुहेरी
आशियाई खेळ
सुवर्ण १९९४ हिरोशिमा पुरुष दुहेरी
सुवर्ण १९९४ हिरोशिमा पुरुष संघ
सुवर्ण २००२ बुसान पुरुष दुहेरी
सुवर्ण २००६ दोहा पुरुष दुहेरी
सुवर्ण २००६ दोहा मिश्र दुहेरी
कांस्य १९९४ हिरोशिमा पुरुष एकेरी
कांस्य २००२ बुसान मिश्र दुहेरी

लिअँडर एड्रीयन पेस ( जून १७, १९७३) एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. लिअँडर सध्या ए.टी.पी. टूरमधील दुहेरी तसेच डेव्हिस करंडक स्पर्धांमध्ये टेनिस खेळतो. आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत.

१५ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याच्या १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिस खेळाडू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिस खेळाडू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठीप्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे.

जीवन

[संपादन]

लिअँडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी गोव्यामध्ये झाला. लिअँडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू असून ते १९७२ म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये होते. लिअँडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. १९व्या शतकामधील प्रसिद्ध बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त हे जेनिफर पेसचे आजोबा होते. लिअँडरचे बालपण कलकत्त्यामध्ये गेले. कलकत्त्यामधील ला मार्तिनिये ह्या प्रसिद्ध शाळेमध्ये तसेच कोलकाता विद्यापीठातील सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे त्याने शिक्षण घेतले. १९८५ साली लिअँडरने मद्रासमधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमीमध्ये दाखला घेतला जेथे त्याचे टेनिस जीवन घडण्यास सुरुवात झाली. १९९० साली विंबल्डन स्पर्धेमधील जुनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिअँडर प्रसिद्धीझोतात आला.

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर लिअँडरने मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत विवाह केला. त्याला आयना पेस ही एक मुलगी आहे.

ग्रँड स्लॅम कारकीर्द

[संपादन]

पुरुष दुहेरी: 16 (8–8)

[संपादन]

२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून पेसने पुरुष दुहेरीमधील ग्रँड स्लॅम पूर्ण केले.

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उप-विजयी 1999 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड भारत महेश भूपती स्वीडन योनास ब्यॉर्कमन
ऑस्ट्रेलिया पॅट्रिक राफ्टर
3–6, 6–4, 4–6, 7–6(12–10), 4–6
विजयी 1999 फ्रेंच ओपन क्ले भारत महेश भूपती क्रोएशिया गोरान इव्हानिसेविच
अमेरिका जेफ टॅरँगो
6–2, 7–5
विजयी 1999 विंबल्डन ग्रास भारत महेश भूपती नेदरलँड्स पॉल हारह्यूस
अमेरिका जॅरेड पामर
6–7(10–12), 6–3, 6–4, 7–6(7–4)
उप-विजयी 1999 यू.एस. ओपन हार्ड भारत महेश भूपती कॅनडा सेबास्तियन लारू
अमेरिका ॲलेक्स ओब्रायन
6–7, 4–6
विजयी 2001 फ्रेंच ओपन (2) क्ले भारत महेश भूपती चेक प्रजासत्ताक पेत्र पाला
चेक प्रजासत्ताक पावेल विझ्नर
7–6, 6–3
उप-विजयी 2004 यू.एस. ओपन हार्ड चेक प्रजासत्ताक डेव्हिड रिकल बहामास मार्क नौल्स
कॅनडा डॅनियेल नेस्टर
3–6, 3–6
उप-विजयी 2006 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड चेक प्रजासत्ताक मार्टिन डॅम अमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
6–4, 3–6, 4–6
विजयी 2006 यू.एस. ओपन हार्ड चेक प्रजासत्ताक मार्टिन डॅम स्वीडन योनास ब्यॉर्कमन
बेलारूस मॅक्स मिर्न्यी
6–7(5–7), 6–4, 6–3
उप-विजयी 2008 यू.एस. ओपन हार्ड चेक प्रजासत्ताक लुकास लूही अमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
6–7(5–7), 6–7(10–12)
विजयी 2009 फ्रेंच ओपन (3) क्ले चेक प्रजासत्ताक लुकास लूही दक्षिण आफ्रिका वेस्ली मूडी
बेल्जियम डिक नॉर्मन
3–6, 6–3, 6–2
विजयी 2009 यू.एस. ओपन (2) हार्ड चेक प्रजासत्ताक लुकास लूही भारत महेश भूपती
बहामास मार्क नौल्स
3–6, 6–3, 6–2
उप-विजयी 2010 फ्रेंच ओपन क्ले चेक प्रजासत्ताक लुकास लूही सर्बिया नेनाद झिमोंजिक
कॅनडा डॅनियेल नेस्टर
5–7, 2–6
उप-विजयी 2011 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड भारत महेश भूपती अमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
3–6, 4–6
विजयी 2012 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड चेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेक अमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
7–6(7–1), 6–2
उप-विजयी 2012 यू.एस. ओपन हार्ड चेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेक अमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
3–6, 4–6
विजयी 2013 यू.एस. ओपन (3) हार्ड चेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेक ऑस्ट्रिया अलेक्झांडर पेया
ब्राझील ब्रुनो सोआरेस
6-1, 6-3

मिश्र दुहेरी: 18 (10–8)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी 1999 विंबल्डन ग्रास अमेरिका लिसा रेमंड रशिया अ‍ॅना कुर्निकोव्हा
स्वीडन योनास ब्यॉर्कमन
6–4, 3–6, 6–3
उप-विजयी 2001 यू.एस. ओपन हार्ड अमेरिका लिसा रेमंड ऑस्ट्रेलिया रेनेइ स्टब्स
ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज
6–4, 5–7, [11–9]
विजयी 2003 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड अमेरिका मार्टिना नवरातिलोव्हा ग्रीस एलेनी डॅनीलिदू
ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज
6–4, 7–5
विजयी 2003 विंबल्डन (2) ग्रास अमेरिका मार्टिना नवरातिलोव्हा रशिया अनास्तासिया रोदियोनोव्हा
इस्रायल अँडी राम
6–3, 6–3
उप-विजयी 2004 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड अमेरिका मार्टिना नवरातिलोव्हा रशिया एलेना बोविना
सर्बिया आणि माँटेनिग्रो नेनाद झिमोंजिक
6–1, 7–6
उप-विजयी 2005 फ्रेंच ओपन क्ले अमेरिका मार्टिना नवरातिलोव्हा स्लोव्हाकिया दानियेला हंटुचोवा
फ्रान्स फॅब्रिस सान्तोरो
3–6, 6–3, 6–2
उप-विजयी 2007 यू.एस. ओपन हार्ड अमेरिका मेगन सॉनेसी बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
बेलारूस मॅक्स मिर्न्यी
6–4, 7–6(8–6)
विजयी 2008 यू.एस. ओपन हार्ड झिम्बाब्वे कारा ब्लॅक अमेरिका लिझेल ह्युबर
युनायटेड किंग्डम जेमी मरे
7–6, 6–4
उप-विजयी 2009 विंबल्डन ग्रास झिम्बाब्वे कारा ब्लॅक जर्मनी ॲना-लेना ग्रोनेफेल्ड
बहामास मार्क नौल्स
7–5, 6–3
उप-विजयी 2009 यू.एस. ओपन हार्ड झिम्बाब्वे कारा ब्लॅक अमेरिका कार्ली गुलिक्सन
अमेरिका ट्रॅव्हिस पॅरट
6–2, 6–4
विजयी 2010 ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड झिम्बाब्वे कारा ब्लॅक रशिया येकातेरिना माकारोव्हा
चेक प्रजासत्ताक यारोस्लाव लेविन्स्की
7–5, 6–3
विजयी 2010 विंबल्डन (3) ग्रास झिम्बाब्वे कारा ब्लॅक अमेरिका लिसा रेमंड
दक्षिण आफ्रिका वेस्ली मूडी
6–4, 7–6
उप-विजयी 2012 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड रशिया एलेना व्हेस्निना अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स
रोमेनिया होरिया तेकाउ
3–6, 7–5, [3–10]
उप-विजयी 2012 विंबल्डन ग्रास रशिया एलेना व्हेस्निना अमेरिका लिसा रेमंड
अमेरिका माइक ब्रायन
3–6, 7–5, 4–6
विजयी 2015 ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस फ्रान्स क्रिस्टिना म्लादेनोविच
कॅनडा डॅनियेल नेस्टर
6–4, 6–3
विजयी 2015 विंबल्डन (4) ग्रास स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस ऑस्ट्रिया अलेक्झांडर पेया
हंगेरी तिमेआ बाबोस
6-1, 6-1
Winner 2015 यू.एस. ओपन (2) हार्ड स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स
अमेरिका सॅम क्वेरी
6–4, 3–6, [10–7]
Winner 2016 फ्रेंच ओपन क्ले स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस भारत सानिया मिर्झा
क्रोएशिया इव्हान दोदिग
4–6, 6–4, [10–8]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]