योगेश्वर दत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
योगेश्वर दत्त
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव योगेश्वर दत्त
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान हरयाणा, भारत
जन्मदिनांक २ नोव्हेंबर, १९८२ (1982-11-02) (वय: ३९)
जन्मस्थान हरयाणा
खेळ
देश भारत
खेळ कुस्ती
खेळांतर्गत प्रकार फ्रीस्टाइल कुस्ती


योगेश्वर दत्त (जन्म नोव्हेंबर २, १९८२) हा एक भारतीय कुस्तीपटू आहे. २०१२ उन्हाळी ऑलिंपिक लंडन ऑलिंपिक खेळात त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकणारा तो तिसरा भारतीय आहे. २००६ साली दोहायेथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. २०१० मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल खेळात त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.