Jump to content

होरिया तेकाउ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होरिया तेकाउ (१९ जानेवारी, इ.स. १९८५:ब्रासोव्ह, रोमेनिया - ) हा रोमेनियाचा टेनिस खेळाडू आहे. दुहेरी प्रकारातून खेळणारा तेकाउ २०१०, २०११ आणि २०१२ च्या विंबल्डन स्पर्धांतील पुरुष दुहेरी प्रकारातील उपविजेता होता. २०१५मध्ये तेकाउने ही स्पर्धा ज्याँ-जुलियेन रॉजर सह जिंकली. तसेच तेकाउने बेथनी मॅटेक-सँड्स बरोबर २०१२ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरी प्रकार जिंकला.

याशिवाय तेकाउने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेतील पुरुष दुहेरी प्रकरात रौप्यपदक मिळविले.