अभिनव बिंद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अभिनवसिंग बिंद्रा
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव अभिनवसिंग बिंद्रा
टोपणनाव अभि
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २८ सप्टेंबर, १९८२ (1982-09-28) (वय: ३६)
जन्मस्थान देहरादून, उत्तराखंड, भारत
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार १० मीटर हवाई रायफल

अभिनवसिंग बिंद्रा (पंजाबी: ਅਭਿਨਵ ਬਿੰਦਰਾ ; रोमन लिपी: Abhinav Singh Bindra ;) (२८ सप्टेंबर, इ.स. १९८२; डेहराडून, उत्तराखंड, भारत - हयात) हा भारतीय नेमबाज आहे. त्याचे शिक्षण चंदीगड येथे झाले. त्याची नेमबाजी पाहून वडिलांनी त्याला घरातच शूटिंग रेंज बनवून दिली. वयाच्या १६व्या वर्षी, सन १९९८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा तो सहभागी झाला, तेव्हा तो वयाने सर्वात लहान खेळाडू होता. २००१ साली बिंद्राने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके मिळवली.

अभिनव बिंद्राने इ.स. २००८च्या बीजिंग उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये, तसेच झाग्रेब, क्रोएशिया येथे झालेल्या इ.स. २००६च्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मी. हवाई रायफल नेमबाजीसुवर्णपदक जिंकले. पात्रता फेरीत ५९६ गुणांसह तो चौथ्या स्थानावर राहिला होता; अंतिम स्पर्धेत १०४.५ गुण संपादन करून त्याने एकूण ७००.५ गुणांची कमाई केली.

त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्य आणि एक ब्राँझपदक आणि एशियन गेम्समध्ये एक रौप्य व दोन कांस्यपदकेही जिंकली आहेत.

पुरस्कार[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]