मेरी कोम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मेरी कोम
Mary Kom - British High Commission, Delhi, 27 July 2011.jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव मंगते चुंगनेजंग मेरी कोम
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान इम्फाल, मणिपूर
जन्मदिनांक १ मार्च, १९८३ (1983-03-01) (वय: ३८)
जन्मस्थान कांगथेई, मणिपूर
उंची १.५८ मी (५ फु २ इं)
वजन ५१ किलो (११० पौंड) (फ्ल्यायवेट व पिनवेट)
खेळ
देश भारत
खेळ बॉक्सिंग
प्रशिक्षक एम. नरजीत सिंग

मांगते चुंगनेजंग मेरी कोम (जन्म: १ मार्च १९८३) ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे.[१]मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत फ्लायवेट प्रकारामध्ये तिने कांस्यपदक मिळवले. २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले.

२०१३ साली कोमने अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले.[२]२०१४ साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.

जीवन[संपादन]

मणापूरमधील दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये एक गरीब कुटुंबात मेरी कोमचा जन्म झाला. [३]मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बॅंकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात कां उतरू नये, असे वाटू लागले. घरचा विरोध असतानाही इ.स. २००० मध्ये १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचे बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले; वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर मेरी कोमने आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिने विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग तिचा जागतिक स्पर्धेतील विजेतेपदांचा धडाका सुरू झाला. अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुधा त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते. २००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेर्मध्ये, २००५मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने अजिंक्यपद पटकावले. तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिस्पर्ध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८ मध्ये तिने चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले होते.

पुरस्कार[संपादन]

मेरी कोम संबंधी पुस्तके[संपादन]

  • अनब्रेकेबल (अनुवादित आत्मचरित्र, मूळ लेखिका - एम. सी. मेरी कोम, अनुवादक- विदुला टोकेकर)

संदर्भ[संपादन]

  1. ^ Gaur, Anita. The Life and Times of M.C. Mary Kom (इंग्रजी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789351865995.
  2. ^ Kom, Mary (2013-11-28). Unbreakable (इंग्रजी भाषेत). HarperCollins Publishers India. ISBN 9789351160106.
  3. ^ Gaur, Anita (2015-01-01). Mary Kom Ki Jeevangatha (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789384344313.
  4. ^ "Mary Kom, Vijender and Sushil get Khel Ratna". Chennai, India: The Hindu. 29 July 2009. 8 May 2010 रोजी पाहिले.[मृत दुवा]
  5. ^ पद्मपुरस्कार यादी

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत