ऑस्ट्रेलियन ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलियन ओपन
Australian Open.svg
अधिकृत संकेतस्थळ
सुरुवात इ.स. १९०५
स्थान मेलबर्न
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
स्थळ मेलबर्न पार्क
कोर्ट पृष्ठभाग गवती (१९०५-८७)
हार्ड (१९८८ - )
पुरुष
ड्रॉ 128S / 128Q / 64D
सद्य विजेते नोव्हाक जोकोविच (एकेरी)
बॉब ब्रायन/माइक ब्रायन (दुहेरी)
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे रॉय एमर्सन (६)
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे एड्रियन क्विस्ट (१०)
महिला
ड्रॉ 128S / 128Q / 64D
सद्य विजेत्या व्हिक्टोरिया अझारेन्का (एकेरी)
सारा एरानी/रॉबेर्ता विंची (दुहेरी)
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे मार्गारेट कोर्ट (११)
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे थेल्मा कॉइन लाँग (१२)
मिश्र दुहेरी
ड्रॉ ६४
सद्य विजेते यार्मिला गाय्दोसोव्हा/मॅथ्यू एब्डन
ग्रँड स्लॅम
मागील स्पर्धा
२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन

ऑस्ट्रेलियन ओपन (इंग्लिश: Australian Open) ही चार ग्रँड स्लॅम पैकी एक टेनिस स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात मेलबर्न शहरामधील मेलबर्न पार्क ह्या टेनिस संकुलामध्ये भरवली जाते. ही स्पर्धा १९०५ साली प्रथम खेळवली गेली. १९८७ पर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गवताळ कोर्ट असत परंतु १९८८ सालापासून हार्ड कोर्टवर येथील सामने खेळवले जाऊ लागले.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.


विजेते[संपादन]

१९६९ साली ऑस्ट्रेलियन ओपेन खुली स्पर्धा झाल्यापासून आंद्रे अगासीरॉजर फेडररने पुरुष एकेरीमध्ये प्रत्येकी चार वेळा तर सेरेना विल्यम्सने महिला एकेरीमध्ये पाच वेळा विजय मिळवला आहे.

२०१२ मधील विजेते[संपादन]

स्पर्धा विजेता उप-विजेता स्कोर
पुरुष एकेरी सर्बिया नोव्हाक जोकोविच स्पेन रफायेल नदाल 5–7, 6–4, 6–2, 6–7(5–7), 7–5
महिला एकेरी बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का रशिया मारिया शारापोव्हा 6–3, 6–0
पुरुष दुहेरी चेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेक
भारत लिअँडर पेस
अमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
7–6(7–1), 6–2
महिला दुहेरी रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
रशिया व्हेरा झ्वोनारेवा
इटली सारा एरानी
इटली रॉबेर्ता व्हिंची
5–7, 6–4, 6–3
मिश्र दुहेरी अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स
रोमेनिया होरिया तेकाउ
रशिया एलेना व्हेस्निना
भारत लिअँडर पेस
6–3, 5–7, [10–3]

बाह्य दुवे[संपादन]

मागील
यूएस ओपन
ग्रँड स्लॅम स्पर्धा
जानेवारी
पुढील
फ्रेंच ओपन