धनराज पिल्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

धनराज पिल्ले (जन्म : १६ जुलै, इ.स. १९६८) हे खडकी-पुणे येथे राहणारे एक हॉकी खेळाडू आहेत.

धनराज पिल्ले यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला पण आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर ते भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोचले.. आघाडीवर खेळणाऱ्या धनराजने आतापर्यंत चारशेहून जास्त सामने खेळले असून दोनशेच्या आसपास गोल केले आहेत.

भारताकडून सर्वांत जास्त गोल करणार तो खेळाडू आहे. चार ऑलिम्पिक, चार जागतिक हॉकी करंडक, चार चॅम्पियन्स चषक व चार आशियाई स्पर्धांत भाग घेतला आहे. २००२ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघाचा तो कर्णधार होता. ते सध्या इंडियन एअरलाइनमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत.

धनराज पिल्ले आतापर्यंत इंडियन जिमखाना, एफ सी लॉन, सिलंगूर (मलेशिया), अभाहानी (बांगला देश), स्टुटगार्ट किकर्स, बँक सिंपानाम नॅशनल (मलेशिया), आर्थर ॲंडरसन (कुआलालंपूर) अशा वेगवेगळ्या जागतिक हॉकी क्लबांकडून खेळला आहे.

पुरस्कार[संपादन]

  • अर्जुन पुरस्कार (१९९५)
  • के. के. बिर्ला पुरस्कार (१९९८-९९)
  • राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कार (१९९९)
  • पद्मश्री (२०००)
  • क्रीडा महर्षी हरिभाऊ साने पुरस्कार (२८-७-२०१६)