Jump to content

विनेश फोगट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विनेश फोगट
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव विनेश फोगट
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान बलाली,हरयाणा, भारत
जन्मदिनांक २५ ऑगस्ट, १९९४ (1994-08-25) (वय: २९)
खेळ
देश भारत
खेळ कुस्ती
खेळांतर्गत प्रकार फ्रीस्टाईल कुस्ती
प्रशिक्षक महावीर फोगट


विनेश फोगट (२५ ऑगस्ट, १९९४ - ) ही भारतीय कुस्तीगीर आहे. कुस्ती खेळणाऱ्या फोगट भगिनींच्यापैकी ती एक आहे. तिने २०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.[१] २०२० मध्ये तिला भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[२]

ही महावीर सिंग फोगट यांची पुतणी असून महावीर फोगट यांच्या मुली गीता फोगट आणि बबिता कुमारी फोगट तसेच रितू फोगट या सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या कुस्तीगीर आहेत.[३]

कारकीर्द[संपादन]

२०१३ आशियाई कुस्ती स्पर्धा[संपादन]

२०१३ साली भारतातील नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत विनेशने ५२ किग्रॅ गटात कांस्य पदक जिंकले.[४]

२०१३ राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा[संपादन]

२०१३ साली जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने ५१ किग्रॅ गटात रजत पदक जिंकले.[५]

२०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा[संपादन]

२०१४ साली ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४८ किग्रॅ गटात विनेशने सुवर्णपदक जिंकले.[६]

२०१४ आशियाई क्रीडा स्पर्धा[संपादन]

२०१४ साली इंचेऑन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४८ किग्रॅ गटात विनेशने कांस्यपदक जिंकले.

२०१५ आशियाई अजिंक्यस्पर्धा[संपादन]

२०१५ साली दोहा, कतार येथे झालेल्या आशियाई अजिंक्य स्पर्धेत विनेशने रौप्य पदक जिंकले. इस्तंबूल येथे २०१६ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी झालेल्या पात्रता स्पर्धेत तिने अंतिम फेरी जिंकून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग निश्चित केला.

२०१६ ऑलिम्पिक[संपादन]

२०१६ साली रीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र चीनच्या सन यानान बरोबर झालेल्या उपांत्यपूर्व लढतीच्या वेळी गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिला सामना सोडून द्यावा लागला.[७]

२०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा[संपादन]

२०१८ साली गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विनेशने ४८ किग्रॅ गटात विनेशने सुवर्णपदक जिंकले.[८]

२०१८ आशियाई क्रीडा स्पर्धा[संपादन]

२०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशने सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली.[९]

२०२० उन्हाळी ऑलिंपिक[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wrestler Vinesh Phogat enters history books, becomes first Indian woman to win Asiad gold in wrestling". The Economic Times. 2018-08-20. 2018-08-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Khel Ratna Award: रोहित शर्मा समेत इन 5 को मिलेगा खेल रत्न, खेल मंत्रालय ने लगाई मुहर". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.
  3. ^ "The Story Of These Six Wrestler Sisters From Haryana Is What You Should Read Today". HuffPost India (इंग्रजी भाषेत). 2016-08-18. 2018-08-22 रोजी पाहिले.
  4. ^ "International Wrestling Database". www.iat.uni-leipzig.de (इंग्रजी भाषेत). 2018-09-02 रोजी पाहिले.
  5. ^ "International Wrestling Database". www.iat.uni-leipzig.de (इंग्रजी भाषेत). 2018-09-02 रोजी पाहिले.
  6. ^ "राष्ट्रकुल स्पर्धा- भारताने जिंकलेली पदके" (इंग्रजी भाषेत). 2014-08-04. 2018-09-02 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ "रिओ: विनेशला गंभीर दुखापत, साक्षीला कांस्यची संधी-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-02 रोजी पाहिले.
  8. ^ "Glasgow 2014 - Vinesh Profile". g2014results.thecgf.com (स्पॅनिश भाषेत). Archived from the original on 2018-09-06. 2018-09-02 रोजी पाहिले.
  9. ^ "आशियाई स्पर्धा: विनेशचा ऐतिहासिक सुवर्णवेध-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-02 रोजी पाहिले.