Jump to content

रोणू मजुमदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोणू मजुमदार

रोणू मजुमदार
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

रोणू मजुमदार (जुलै १, २२ जून, इ.स. १९६३; - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत.

जीवन

[संपादन]

रोणू मुजुमदार यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात झाला. त्यांचे वडील भानू मुहुमदार यांच्याकडून त्यांनी बासरीचे शिक्षण घेतले.

सांगीतिक कारकीर्द

[संपादन]
Ronu Majumdar in September 2024 at Bharat Bhavan Bhopal

१९८१ साली त्यांनी आकाशवाणीचे राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावले/

रोणू मुजुमदार यांचे पुण्यात बासरी वादन

विश्वविक्रम

[संपादन]

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड -जगातील सर्वांत मोठ्या सिंफनीद्वारे सादर झालेले संगीत ह्या कामगिरीसाठी पंडित रोणू मजुमदार ह्यांना गौरविण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्यावर मुंबईत राहणाऱ्या पंडित रोणू मजुमदार ह्यांनी ५४६ संगीतकारांची सिंफनी आयोजित करून एक जागतिक विक्रम नोंदवला.गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी त्यांनी केलेली रचना समवेत म्हणून आहे. ह्या रचनेत खालील तीन रागांचा समावेश आहे:-

  1. मियाँ मल्हार.
  2. मियाँ गिटोडी.
  3. दरबारी.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड च्या समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना सर्वांत मोठ्या हिंदुस्थानी शास्त्रीय बँडचा संगीतकार आणि संचालक म्हणून सन्मान करण्यात आला.निलेश बारोट आणि रिचर्ड स्टेनिंग ह्यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. निलेश बारोट हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चे सल्लागार आहेत तर रिचर्ड स्टेनिंग हे अभिनिर्णेता आहेत.पंडित रोणू मजुमदार ह्यांना त्यांच्या सांगितिक कारकिर्दीसाठी खालील लोकांचे मार्गदर्शन लाभले.

  1. डॉ. भानू मजूमदार - त्यांचे वडील.
  2. दिवंगत पंडित लक्ष्मण प्रसाद जयपूरवाले.
  3. पंडित विजय राघव राव

[]

संगीत ध्वनिमुद्रिका

[संपादन]

त्यांच्या अनेक संगीत ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध आहेत.

पुरस्कार व सन्मान

[संपादन]
    • १९८१ साली त्यांनी आकाशवाणीचे राष्ट्रपती सुवर्ण पदक
  1. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड -जगातील सर्वांत मोठ्या सिंफनीद्वारे सादर झालेले संगीत.[]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, रविवार,दिनांक १२ जानेवारी २०२५
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, रविवार,दिनांक १२ जानेवारी २०२५