Jump to content

कुणकेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कुणकेश्वर

महाराष्ट्र • भारत
—  गाव, पर्यटन स्थळ  —
कुणकेश्वर मंदिर
कुणकेश्वर मंदिर
कुणकेश्वर मंदिर
Map

१६° २०′ ००.९१″ N, ७३° २३′ २०.४२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ११ मी
जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा
लोकसंख्या १,८२९ (2011)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 416612
• +०२३६४
• MH07
कुणकेश्वर समुद्रकिनारा
कुणकेश्वर मंदिर
कुणकेश्वर येथील प्राचीन गुहा
Kunkeshwar seashore kokan

कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं, कुणकेश्वराच्या  मंदिराजवळचा हा परिसर आहे. स्वच्छ, कमी वर्दळ असणारा हा किनारा आहे. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो. खाण्यासाठी कुणकेश्वरचे उकडीचे मोदक चविष्ट आहेत .देवगडला उत्तम माशाचे जेवण मिळते. माफक दरात कोकण या ठिकाणी अनुभवता येतो.

कुणकेश्वर गाव[संपादन]

कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस २० किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. तसेच हे गाव 'हापूस आंब्या'साठी प्रसिद्ध आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

कुणकेश्वर मंदिर[संपादन]

कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते.

कुणकेश्वर यात्रा[संपादन]

यात्रेतील देवांच्या खांबकाठ्या

दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ्परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात. कुणकेश्वर भेटीसाठी १२ किमी. अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दिर्बा-रामेश्वरसाठी तारांमुंबरी खाडीवर नौकासेतू बांधला जातो. दर २४ वर्षॉंनी कुणकेश्वरच्या भेटीला येणाऱ्या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजतगाजत कुणकेश्वर क्षेत्री आणतात. १६ किलोमीटरवरून येणाऱ्या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुणकेश्वरची भेट घेते. ५० किलोमीटरवरून येणारा मसुरे गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गावरयतेसहित कुणकेश्वरच्या भेटीला येतो. तसेच किंजवडे-स्थानेश्वर, दाभोळे-पावणाई, टेंबवली-कवळाई, असे अनेक देव त्याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वरची पायी वारी म्हणजेच यात्रा करतात.

कुणकेश्वर चौपाटी[संपादन]

कुणकेश्वर मंदिराजवळच प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. येथे दरवर्षी लाखोच्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्रातील जांभ्या दगडांवर सुमारे १०० शिवलिंगे कोरलेली आहेत. ओहटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात.

कुणकेश्वर येथील प्राचीन गुहा[संपादन]

कुणकेश्वर गावातील एका डोंगरात जांभ्या दगडात एक गुहा आहे. या गुहेत शिवलिंग, नंदी, तसेच स्त्री-पुरुषांचे अनेक दगडी मुखवटे आहेत.