सिद्धार्थ विधी महाविद्यालय (मुंबई)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिद्धार्थ विधी महाविद्यालय




सिद्धार्थ विधी महाविद्यालय (सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ) हे मुंबईतील एक कायद्याचे महाविद्यालय असून याची स्थापना १९५६ मध्ये झाली.[१] हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे चालते, जी ८ जुलै १९४५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.[२] समाजातील सर्व घटकांमध्ये कायदेशीर शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून महाविद्यालय तयार करण्यात आले. हे महाविद्यालय एमएनएमआरडीएच्या वारसा सोसायटीद्वारे वारसा रचना म्हणून घोषित केले आहे.[३]

उपलब्ध अभ्यासक्रम[संपादन]

सध्या महाविद्यालयात तीन वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. परंतु, पाच वर्षे बीएसएल, एलएलबी अभ्यासक्रम देखील प्रस्तावित आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि सर्टिफिकेशन कोर्स देखील महाविद्यालयाद्वारे आयोजित आहेत.

ग्रंथालय[संपादन]

महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये कायद्याच्या पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. महाविद्यालय हे डॉ. आंबेडकरांच्या वैयक्तिक संकलनातील काही दुर्मीळ पुस्तकांचे देखील एक घर आहे, जे भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या संदर्भात वापरण्यात आले होते.[४]

भेटी आणि कार्यक्रम[संपादन]

पूर्वी महाविद्यालयाला श्रीमती सिरिमावो भंडारनायके सारख्या अनेक व्यक्तिमत्त्यांनी भेट दिली होती. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी.बी. मजूमदार, न्यायमूर्ती रोशन दळवी आणि अनेक अन्य कायदेतज्ज्ञांनी भेटी दिल्या.[५] महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अजमल कसाबच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मुकदम्यास उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली होती, जी सामान्यपणे सामान्य जनतेसाठी प्रतिबंधित होती.[६]

महाविद्यालयाशी संबंधित उल्लेखनीय लोक[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ambedkarmission". Ambedkarmission.org. Archived from the original on 2014-11-26. 14 November 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Affiliation : University Affiliated Colleges > Law > Colleges". Mu.ac.in. Archived from the original on 2014-10-21. 14 November 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "DIRECTORY OF BEST COLLEGES 2015: RANKS.JSP |". indiatoday.intoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-03-15 रोजी पाहिले.
  4. ^ "Rare draft of constitution falling apart in city college - Mumbai Mirror -". Mumbai Mirror. 2018-03-15 रोजी पाहिले.
  5. ^ "Today". Afternonndc.in. Archived from the original on 2017-02-22. 14 November 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "'We wanted to throw a shoe at Qasab'". Mid-day.com. 14 November 2014 रोजी पाहिले.
  7. ^ "The Radical Humanist - NEWS-Justice R.A. Jahagirdar is no more!". Theradicalhumanist.com. Archived from the original on 2013-02-04. 14 November 2014 रोजी पाहिले.
  8. ^ "Farooq Shaikh". IMDb. 2018-03-15 रोजी पाहिले.
  9. ^ "'Unassuming' Pawar takes the hot seat - Times of India". The Times of India. Archived from the original on 2013-01-03. 2018-03-15 रोजी पाहिले.
  10. ^ "Suresh Saraiya, one of the best-loved radio commentators". Rediff. 19 July 2012. 14 November 2014 रोजी पाहिले.
  11. ^ "PRS". www.prsindia.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-15 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ