Jump to content

अजमल कसाब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहम्मद अजमल आमीर इमान ऊर्फ अजमल कसाब (जुलै १३, इ.स. १९८७ - २१ नोव्हेंबर, इ.स. २०१२) हा नोव्हेंबर २६ २००८ रोजी महाराष्ट्रातील मुंबई शहरात घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांत सामील झालेला एक पाकिस्तानी दहशतवादी . या हल्ल्यांमध्ये अटक झालेला कसाब हा एकमेव दहशतवादी होता. पाकिस्तानने आधी कसाब त्यांचा नागरिक असल्याचा इन्कार केला होता. परंतु ७ जानेवारी, इ.स. २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृत रित्या मान्य केले[].

अजमल कसाब यास तुकाराम ओंबळे यांनी गिरगाव चौपाटी वर अटक केली. अटक करत असताना तुकाराम ओंबळे यांना आपल्या प्राणांची आहुति द्यावी लागली.


हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Ajmal`s nationality confirmed". 2013-11-09 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जून २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]