मैहर घराणे
Appearance
मैहर घराणे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एक घराणे आहे. याची सुरुवात भारताच्या मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील मैहर या छोट्या शहरात झाली.
मैहर संस्थानाच्या राजवाड्यात अनेक संगीतकार आणि त्यांचे शिष्य यांना राजाश्रय होता.
प्रसिद्ध संगीतकार
[संपादन]- उस्ताद अलाउद्दीन खान
- अन्नपूर्णा देवी (अलाउद्दीन खान यांची कन्या)
- सरोदवादक उस्ताद अली अकबर खान (अलाउद्दीन खान यांचे पुत्र)
- पंडित रविशंकर (अलाउद्दीन खान यांचे शिष्य)
- आशीष खान (अलाउद्दीन खान यांचे नातू)
- ध्यानेश खान (अलाउद्दीन खान यांचे दुसरे नातू)
- प्रणेश खान (अलाउद्दीन खान यांचे तिसरे नातू)
- बहादुर खान (अलाउद्दीन खान यांचे पुतणे)
- तिमिरबरन भट्टाचार्य (अलाउद्दीन खान यांचे पहिले शिष्य)
- इंद्रनील भट्टाचार्य (तिमिरबरन यांचे पुत्र)
- वसंत राय पंडित (अलाउद्दीन खान यांचे शिष्य)
- बासरीवादक पन्नालाल घोष (अलाउद्दीन खान यांचे शिष्य)
- सतारवादक पंडित निखिल बॅनर्जी (अलाउद्दीन खान यांचे शेवटचे शिष्य)
- पं. नारायण
- पं. शांताप्रसाद
- शरन रानी
- बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया
- व्हायोलीन वादक व्ही.जी. जोग, वगैरे