Jump to content

"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५: ओळ ५:
|चित्र_वर्णन = राजगृह
|चित्र_वर्णन = राजगृह
|इमारतीची उंची =
|इमारतीची उंची =
|ठिकाण = [[दादर]], [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
|ठिकाण = हिंदू कॉलनी, [[दादर]], [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
|latd = | latm = | lats =
|latd = | latm = | lats =
|longd = | longm = | longs =
|longd = | longm = | longs =
|बांधकाम सुरुवात = इ.स. १९३१
|बांधकाम सुरुवात = इ.स. १९३१
|बांधकाम पूर्ण = इ.स. १९३३
|बांधकाम पूर्ण = इ.स. १९३३
|इमारतीचा प्रकार = वास्तू
|इमारतीचा प्रकार = स्मारक, वास्तू
|वास्तुशास्त्रीय =
|वास्तुशास्त्रीय =
|छत =
|छत =
|वरचा मजला = ३
|वरचा मजला = ३
|एकूण मजले =
|एकूण मजले =
|प्रकाशमार्ग =
|प्रकाशमार्ग =
|मूल्य =
|मूल्य =
|क्षेत्रफळ =
|क्षेत्रफळ =
|वास्तुविशारद =
|वास्तुविशारद =
|रचनात्मक अभियंता =
|रचनात्मक अभियंता = [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
|कंत्राटदार =
|कंत्राटदार =
|विकासक =
|विकासक =
|मालकी = [[आंबेडकर कुटुंब]]
|मालकी = [[आंबेडकर कुटुंब]]
|व्यवस्थापन =
|व्यवस्थापन =
|references =
|references =
}}
}}



१५:३८, ८ जुलै २०२० ची आवृत्ती

राजगृह
सर्वसाधारण माहिती
प्रकार स्मारक, वास्तू
ठिकाण हिंदू कॉलनी, दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
बांधकाम सुरुवात इ.स. १९३१
पूर्ण इ.स. १९३३
ऊंची
वरचा मजला
एकूण मजले
बांधकाम
मालकी आंबेडकर कुटुंब
रचनात्मक अभियंता डॉ. बाबासाहेब आंबेडकर


राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - बौद्धदलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.[]

शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून ६ डिसेंबरला लाखो अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी ५०,०००हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.[]

रचना

राजगृह ही तीन मजली इमारत आहे. त्याचा पहिला महिला मजला स्मारक म्हणून विकसित केला गेला असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या अनेक दुर्मिळ वस्तुंचा संग्रह आहे. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यात आंबेडकर कुटुंबीय राहतात.

इतिहास

इ.स. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यालय परळ येथे होते, व ते मुंबईतील पोयबावाडी परिसरात राहत असत. त्यांचे सदर घरी त्याच्या पुस्तकांची अपुऱ्या जागेअभावी नीट व्यवस्था होत नसे, म्हणून त्यांनी पुस्तकांसाठी खास घर बांधण्याचे मनावर घेतले.

दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट खरेदी केले. बांधकामासाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेखीसाठी आईसकर यांना नेमले. व १९३१ ते १९३३ या दोन वर्षांत बांधकाम पूर्ण झाले. दोन प्लॉट्सवरील बांधकामांपैकी प्लॉट क्रमांक ९९ वरील 'चार मिनार' नावाची इमारत त्यांनी ग्रंथ खरेदी व कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी विकली. प्लॉट क्रमांक १२९ वरील ५५ चौरस यार्ड जागेवर बांधलेले राजगृह त्यांनी पुस्तकांसाठी ठेवले. तेथेच ते कुटुंबीयांसह राहत असत.

तोडफोड

७ जुलै २०२० रोजी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून राजगृहाची तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून झाडांच्या कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे.[][][][]

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "बाबासाहेबांच्या 'राजगृहा'च्या आसपास फेरीवाल्यांचा डेरा". Loksatta. 2015-10-10. 2018-04-30 रोजी पाहिले.
  2. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'राजगृह'ने घेतला मोकळा श्वास". दिव्य मराठी. 2 मे 2018 रोजी पाहिले.
  3. ^ गायकवाड, गिरीश; मराठी, टीव्ही 9; मुंबई (2020-07-08). "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर तोडफोड". TV9 Marathi (इंग्रजी भाषेत). 2020-07-08 रोजी पाहिले.
  4. ^ "Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा". Loksatta. 2020-07-08. 2020-07-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Dr BR Ambedkar's house | डॉ. आंबेडकरांच्या 'राजगृह' निवासस्थानावार अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड". marathi.abplive.com. 2020-07-08. 2020-07-08 रोजी पाहिले.
  6. ^ टीम, एबीपी माझा वेब (2020-07-08). "राजगृह महाराष्ट्रातील जनतेसाठी तीर्थक्षेत्र, अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही : मुख्यमंत्री". marathi.abplive.com. 2020-07-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत