"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४८: ओळ ४८:
</gallery>
</gallery>


==हे सुद्धा पहा==
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[चैत्यभूमी]]
* [[चैत्यभूमी]]
* [[दीक्षाभूमी]]
* [[दीक्षाभूमी]]

२०:३५, ३१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

राजगृह
सर्वसाधारण माहिती
प्रकार वास्तू
ठिकाण दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
बांधकाम सुरुवात इ.स. १९३१
पूर्ण इ.स. १९३३
ऊंची
वरचा मजला
मालकी आंबेडकर कुटुंब


राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - बौद्धदलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.[१]

शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून ६ डिसेंबरला लाखो अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी ५०,०००हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.[२]

रचना

राजगृह ही तीन मजली इमारत आहे.

इतिहास

इ.स. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यालय परळ येथे होते, व ते मुंबईतील पोयबावाडी परिसरात राहत असत. त्यांचे सदर घरी त्याच्या पुस्तकांची अपुऱ्या जागेअभावी नीट व्यवस्था होत नसे, म्हणून त्यांनी पुस्तकांसाठी खास घर बांधण्याचे मनावर घेतले.

दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट खरेदी केले. बांधकामासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेखीसाठी आईसकर यांना नेमले. व १९३१ ते १९३३ या दोन वर्षांत बांधकाम पूर्ण झाले. दोन प्लॉट्सवरील बांधकामांपैकी प्लॉट क्रमांक ९९ वरील 'चार मिनार' नावाची इमारत त्यांनी ग्रंथ खरेदी व कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी विकली. प्लॉट क्रमांक १२९ वरील ५५ चौरस यार्ड जागेवर बांधलेले राजगृह त्यांनी पुस्तकांसाठी ठेवले. तेथेच ते कुटुंबीयांसह राहत असत.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Loksatta. 2015-10-10 https://www.loksatta.com/mumbai-news/hawkers-encroachment-near-ambedkar-house-at-dadar-1148960/. 2018-04-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ दिव्य मराठी https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5268154-NOR.html. 2 मे 2018 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत