सदस्य चर्चा:निनावी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृपया लेखातील [[ ]] अशी चिन्हे वगळू/काढू नका. त्यामुळे त्या शब्दांचे दुवे निघून जातात. संतोष दहिवळ २१:४०, १ डिसेंबर २०११ (UTC)

सांगकाम्या[संपादन]

तुमच्या सांगकाम्या विनंतीमध्ये Owner - Multiple असे लिहिलेले आहे. यावर थोडा प्रकाश टाकाल काय? एकाहून अधिक व्यक्ती हा सांगकाम्या चालवणे अपेक्षित आहे?

अभय नातू १९:५२, ३ डिसेंबर २०११ (UTC)

My comment on the bot request page --
Thanks for your clarification. If there are multiple owners/areas to be targeted, I'd recommend creating different accounts and designating each for a particular task. For example, I have a three bots that work on separate tasks -- क्रिकाम्या - tasks related to cricket articles, रिकाम्या -- शुद्धलेखन/spelling corrector, हरकाम्या - all other tasks, etc.

This allows the owner(s) to keep track of what's going on at all times and a bit more clarity for the rest of the user population to understand the changes. Of course, this is only a suggestion and not mandatroy. Let me know what you think.

अभय नातू १५:५१, ४ डिसेंबर २०११ (UTC)

अवधी / अवधि[संपादन]

आपण आपल्या काही बदलांमध्ये साचा:माहितीचौकट चित्रपट मध्ये अवधी ला बदलून अवधि केल्याचे आढळले. या बदलाने अवधी ही माहिती त्या लेखातून नाहीशी होईल. अवधी हे माहितीचौकट चित्रपट या साच्या चे एक parameter आहे. याला साचा वापरलेल्या ठिकाणी बदलून चालणार नाही. आपण हा बदल साचा चर्चा:माहितीचौकट चित्रपट येथे सुचवू शकता. - प्रबोध (चर्चा) २०:२३, ४ डिसेंबर २०११ (UTC)

वस्तू हे लेखन योग्य[संपादन]

नमस्कार निनावी,

डी.एस. कुलकर्णी या लेखात आपण "वस्तू" हे पूर्वीचे लेखन बदलून "वस्तु", असे केलेले पाहिले. या दुरुस्तीमागचे कारण कळले, तर उत्तम. कारण संस्कृतातील र्‍हस्वान्त शब्द मराठी उच्चारप्रवृत्तीनुसार दीर्घान्त लिहिण्याची पद्धत आहे. र्‍हस्वान्त लेखने मराठीत अयोग्य धरली जात नसली, तरीही सहसा दीर्घान्त लिहिण्यास प्राधान्य देण्याचा शिरस्ता दिसतो. प्रा. यास्मिन शेख यांनी लिहिलेला "मराठी लेखनकोश" नामक ग्रंथ आपण संदर्भासाठी पाहू शकता.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१४, ६ डिसेंबर २०११ (UTC)

व्याकरण संबंधीचे बदल स्वयंचलित संगकाम्यांद्वारे करणे तितकेसे सोपे नाही. उदा: आपला बदल
या मध्ये प्रती मधला ती दीर्घ आहे (जो वर दिलेल्या लेखात बरोबर होता), परंतु, प्रति, माननीय संपादक... या मधला ति ऱ्हस्व आहे. अश्या बाबतीत सर्व प्रति ला प्रती मध्ये बदलणे किंवा प्रती ला प्रति मध्ये बदलणे चुकीचे ठरेल. - प्रबोध (चर्चा) १३:१९, ७ डिसेंबर २०११ (UTC)
नमस्कार ! आज आपण श्री गुरुगीता या लेखात केलेले बदल पाहिले. त्यात "भक्तिपूर्वक" हे बदलून "भक्तीपूर्वक" असे बदलले होते; जे चूक आहे. मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार संस्कृतजन्य सामासिक शब्दांत पूर्वपदातील र्‍हस्वान्त शब्द (येथे "भक्ति" हा मूळ संस्कृतातून आलेला शब्द) र्‍हस्वान्तच ठेवला जातो. तो दीर्घान्त करू नये. त्याच नियमाने "गुरुपद" हा सामासिक शब्द योग्य आहे; त्याचे "गुरूपद" करू नये.
तसेच, "करित" हा बदल चुकीचा आहे. "करीत" (हा करणे या क्रियापदाच्या "करत" या रूपाचा पर्याय आहे) हे लेखन बरोबर आहे; त्याचे "करित" करू नये. "वाचीत (बसणे)", "बोलीत (सुटणे)" इत्यादी उदाहरणे पाहिल्यास, मी काय म्हणतोय त्याची आपल्याला कल्पना येईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:४४, ७ डिसेंबर २०११ (UTC)

शुद्धलेखनाचे नियम[संपादन]

नमस्कार निनावी,

शुद्धलेखनाचे नियम येथे मराठी शुद्धलेखनाचे सध्या प्रचलित असलेले नियम उपलब्ध आहेत. त्यात र्‍हस्वान्त, दीर्घान्त शब्द आणि त्यांत सामासिक शब्दांसाठीचे पोटनियम मांडले आहेत. ते कॄपया बघावेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३७, ७ डिसेंबर २०११ (UTC)

आपण आपली यादी इतर जाणत्या सदस्यांकडून एकदा verify करून घ्याल का? सांगकाम्याने केलेले बदल नंतर शोधून दुरुस्त करणे अवघड ठरेल, व सांगकाम्या मार्फत बदल करणे, सोपे ठरायच्या ऐवजी, आणखी अवघड होऊन बसेल. कळावे - प्रबोध (चर्चा) ११:३७, ८ डिसेंबर २०११ (UTC)

काही शब्द[संपादन]

नमस्कार !

दुसरे महायुद्ध लेखात "डिव्हिजनने" => "डिव्हीजनने" असा बदल झाला आहे. आता हा शब्द मुळात इंग्लिश भाषेतून मराठीत उसना आला असला, तरीही उच्चाराधारित पद्धतीने याचे लेखन काय होते, हाच निकष महत्त्वाचा ठरतो. या निकषानुसार (मला वाटते) की, "डिव्हिजन" असे लेखन अधिक योग्य ठरेल (कारण [http://www.thefreedictionary.com/division येथील उच्चारानुसार "व्हि" र्‍हस्व उच्चारयुक्त ऐकू येतो). या शब्दाच्या विभक्तिरूपांमध्ये "डिव्हिजनने" (किंवा खरे तर या शब्दावर बहुशः स्त्रीलिंग आरोपले जात असल्यामुळे, मराठी व्याकरणाचे नियम योग्य पद्धतीने वापरल्यास "डिव्हिजनीने" असे रूप होईल. पण तूर्तास हा मुद्दा काही काळ बाजूस ठेवू.) वगैरे रूपेही र्‍स्वोचारित "व्हि" असलेली असतील.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:०९, ११ डिसेंबर २०११ (UTC)

गीतरामायण यात खरे तर शुद्धलेखनाचे नियम लावणे योग्य ठरणार नाही; कारण वृत्त साधण्यासाठी काही वेळा र्‍हस्व/दीर्घाच्या नियमांपासून सवलत घेण्याचे काव्यस्वातंत्र्य घेतले जाते. त्यामुळे "जोडून" हे योग्य असले, तरीही काही वेळा कवीमंडळी वृत्तात बसण्यासाठी "जोडुन" असे लेखन लिहू शकतात. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:१३, ११ डिसेंबर २०११ (UTC)

कन्नड/कानडी[संपादन]

कन्नड नावाचे एक गावही आहे. डेटाबेसमध्ये काही बदल करता येईल का पहावे. संतोष दहिवळ १७:५८, १४ डिसेंबर २०११ (UTC)

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, निनावी

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


सांगकाम्या[संपादन]

नमस्कार,

तुम्ही चालवत असलेल्या सांगकाम्याला आता अधिकृतरीत्या सांगकाम्या ठरवण्यास हरकत नाही. तुमचे मत कळवावे.

अर्थात, या सांगकाम्याचे काम अनेक सदस्य नजरेत ठेवत असल्याचे गृहीत धरलेले आहे.

अभय नातू ०४:५८, २२ डिसेंबर २०११ (UTC)

नमस्कार[संपादन]

आयुर्वेदातील विविध संज्ञा या लेखात कुपथ्य हा शब्द वगळुन पूर्ववत अपथ्य करावे ही विनंती.या दोन्हीच्या अर्थात सुक्ष्मसा फरक आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १७:०८, २२ डिसेंबर २०११ (UTC)

दिनांक पद्धती[संपादन]

नमस्कार निनावी!

लेखांच्या मजकुरातल्या १ सप्टेंबर या तारखांमध्ये बदल करून सप्टेंबर १ वगैरे बदल करणे टाळावे, अशी विनंती. कारण दोन्ही पद्धती ग्राह्य मानल्या जात असल्याने एतत्संबंधाने संपादन करणार्‍या/लेख निर्मिणार्‍या सदस्यांनी ते ठरवणे अधिक बरे ठरेल. बॉट चालवून दिनांकांच्या पद्धतीत कृपया बदल करू नये.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५३, २३ डिसेंबर २०११ (UTC)

अर्धा र[संपादन]

आपल्या अलीकडील संपादनात 'य'ला जोडून येणार्या अर्ध्या र चे योग्य बदल होताना दिसत नाहित. पूर्वी असे बदल होत होते. (अधिक खुलासेवार म्हणजे येणार्या ऐवजी येणार्‍या असे) -संतोष दहिवळ २२:२७, २६ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply[reply]


येणार्यापेक्षा येणार्‍या बरा. र्‌+य हे जोडाक्षर फक्त मराठीत आहे, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये नाही. त्यामुळे ते टंकलिखित करण्यासाठी देवनागरी फॉन्ट्‌समध्ये सोयच नव्हती. अजूनही सोय झाली असली तरी ते अक्षर इन्टरनेट एक्सप्लोअररवर योग्य उमटते,मोझिला फायरफॉक्ससारख्या इतर काही अन्य पानांवर नाही....J २३:०५, २६ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply[reply]

Not sure what is happening[संपादन]

Adding the same text to many user pages is close to unacceptable behaviour, and the way (how and where) that you have done it has sent out alerts . I am going to point local administrators to this page to sort out the matter to manage Special:Contributions/निनावी. If the text is to be added, it should be targetted, especially not text to banned accounts, and it might be worth looking to get it done through a bot so it doesn't send out broader alerts. Thanks. I will remove the block and ask that you get a better plan before continuing. Billinghurst (चर्चा) १७:२४, ११ मार्च २०१२ (IST)Reply[reply]

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)[संपादन]

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी[संपादन]

नमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २३:०६, ११ मार्च २०१२ (IST)Reply[reply]

धन्यवाद[संपादन]

नमस्कार, Some useful tips for typing in new Input method (transliteration mode) ही माहिती फारच उपयुक्त होती. मला आत्ता त्याची गरज होती आणि मराठी विकीपेडिया सोडून दुसरीकडे कुठेही ती उपलब्ध झाली नाही. अनेक धन्यवाद.

Translating the interface in your language, we need your help[संपादन]

Hello निनावी, thanks for working on this wiki in your language. We updated the list of priority translations and I write you to let you know. The language used by this wiki (or by you in your preferences) needs about 100 translations or less in the priority list. You're almost done!
सर्व विकिंवर अनुवाद जोडण्याकरता किंवा बदलण्याकरता, कृपया ट्रांसलेटविकि.नेटचा वापर करा,जो मिडियाविकिचा स्थानिकीकरण प्रकल्प आहे.

Please register on translatewiki.net if you didn't yet and then help complete priority translations (make sure to select your language in the language selector). With a couple hours' work or less, you can make sure that nearly all visitors see the wiki interface fully translated. Nemo १९:३६, २६ एप्रिल २०१५ (IST)Reply[reply]

मराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुप[संपादन]

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:०३, ५ जून २०१७ (IST)Reply[reply]

Bot malfunction[संपादन]

Dear Bot user,

The bot is making mistakes from a few days and today morning I have reverted many of its edits. Please stop the same immediately. Failing so may even lead you a block. Regards --Tiven2240 (चर्चा) १८:५४, ३ एप्रिल २०२० (IST)Reply[reply]

I have temporarily blocked this account due to a malfunction. Please ask an admin to unblock once the issue is resolved. --Martin Urbanec (चर्चा) १९:०२, ३ एप्रिल २०२० (IST)Reply[reply]

Hi Tiven2240, Care to share the details?


Hi निनावी,

Can you please share the list of strings those you have changed in the last bot run? I am almost sure that the following change that you made to several pages is wrong.

ँ > ॅ ं

I will like to know if there are more such mistakes. It is not possible unless you let the community know about the source of your script.

Shantanuo (चर्चा) १०:०४, १३ एप्रिल २०२० (IST)Reply[reply]


Hi Shantanuo,

You might want to check the last point on हिंदी_मराठी_उच्चार.


Hi निनावी,
The last point on that page explains how to write in Hindi. It does not help to justify your changes.
The essence of wikipedia is it's transparency and being answerable to wider community. Your contributions are valuable and most of them (let's say 99.99%) are correct. And still I am raising this issue because I think being committed to community is more important than you think. If you scroll this page up, you will see a lot of users like Prabodh, Sankalp Dravid have asked some questions about your edits and you have not answered a single one. May be those questions are not worth your time. But don't you think it is important to document the changes those are being applied across all articles? A few years/ decades down the line you will thank yourself for open sourcing your technical expertise.
Please sign your comments like this...
Shantanuo (चर्चा) ०७:४९, ११ जून २०२० (IST)Reply[reply]

Can you expand the article on Indian Institute of Science Education and Research Berhampur article in marathi? You can refer the article in Odia for extra data. It will be very much helpful. Thank you ଲେଖକ (चर्चा) ००:३८, १८ मार्च २०२१ (IST)Reply[reply]

Bot malfunctioning[संपादन]

Hi @निनावी: there is still malfunction of this bot. Unless you don't fix it I am forced to block it from further edits. This has affected alot of pages. --Tiven2240 (चर्चा) १५:२७, २१ एप्रिल २०२१ (IST)Reply[reply]