Jump to content

"बलिप्रतिपदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १९: ओळ १९:

- सच्चिदानंद शेवडे गुरुजी
- सच्चिदानंद शेवडे गुरुजी

==अन्यत्र वाचलेला आणि नकल-डकव केलेला मजकूर==
एक असत्य सहस्रवेळा सांगितले की ते सत्य वाटायला लागते ह्या गोबेल्स तंत्राप्रमाणे एरवी सर्व धर्मेतिहास थोतांड असला तरी हेतुपुरस्सर प्रतिवर्षी दीपावली आली व पाडवा आला की बळी व वामनावताराची मूळची सूर्याची रूपक कथा, जी पुराणांनी अकारण ऐतिहासिक करून विपर्यस्त केली, त्या कथेंस आपल्या टिपिकल ब्रेकिंग इंडिया प्रक्रियेसाठी व फोडा नि झोडा ह्या अनीतीसाठी तिचा विपर्यांस करून ब्राह्मण-विरुद्ध ब्राह्मणेतर, तथाकथित बहुजन, आर्य-अनार्य वाद पेटवीत राहणे हे सांप्रतचे धंदे आपणांस समाजमाध्यमांतून तर नेहमीच पहायला मिळतात. त्यावर काहींनी तर म्हणे ग्रंथनिर्मितीही केली आहे.

वस्तुत: ह्या वामनाच्या कथेतल्या बळीराजाचा शेतकऱ्यांशी काडीमात्र संबंध नसताना तो जोडला जाऊन ह्या कथेतून ब्राह्मण वर्ग हा शेतकऱ्यांशीच द्रोही आहे असे ठसविण्याचा विकृत हेतु हल्लीच्या लेखनांतून सतत सुरू आहे.

शेतकऱ्याला बळीराजा म्हणायचेच असेल तर त्यांचा संबंध ज्यांच्या हातात आपण सदैव हल म्हणजे नांगर पाहतो, ज्यांची गदा व हल म्हणजे नांगर ही प्रमुख आयुधे आहेत, अशा.भगवान श्रीकृष्णांचे थोरले बंधू बलरामदादांशी जोडायला हवा आहे. पण हेतुपुरस्सर त्याचा संबंध बळी वामनाच्या कथेशी जोडून भेदनीती अवलंबिली जाती आहे. त्याचे खंडन करण्यासाठी व ह्या कथेचा नेमका परामर्श घेण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच !

वामनावताराची पुराणांतली कथा ही एका मूळ वैदिक रूपक कथेचे ऐतिहासिक अलंकारिक रूपांतर आहे.

पुराणांतली कथा आम्ही इथे सांगत बसत नाही ती सर्वांस परिचित आहे. तेव्हा ही कथा मूळची ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातली २२ व्या व १५४ व्या सूक्तांमधील ऋचेवरून घेतली आहे, तीत तो सूर्य अर्थात विष्णू ह्या तीन गोष्टींना आपल्या तीन पावलांत व्यापतो. ही तीन पावले म्हणजे दिवसाचे सकाळ, सायंकाळ व रात्र असे तीन भाग किंवा विश्वाचे पृथ्वी, आकाश व पाताळ असे तीन भाग ह्या अर्थाने आहे. ही सूर्यकिरणांनी व्यापिलेल्या ह्या तीन भागांची रूपक कथा ऋग्वेदामध्ये आहे. ह्या तीन पावलांत तो सूर्य अर्थात विष्णू सर्व विश्व व्यापितो. ते मूळ पाच मंत्र पाहू यात.

अतो॑ दे॒वा अ॑वंतु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे । पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः ॥१६॥

इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दं । समू॑ळ्हमस्य पांसु॒रे ॥१७॥

त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः । अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् ॥१८॥

विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥१९॥

तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यंति सू॒रयः॑ । दि॒वी॑व॒ चक्षु॒रात॑तं ॥२०॥

तद्विप्रा॑सो विप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते ।विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दं ॥२१॥

ह्या पाचही मंत्रांचा अर्थ सायण नावाच्या भाष्यकारानुसार सांगायचा तर विष्णूने अर्थात सूर्याने ह्या संसारास तीन पावलांनी व्यापले आहे. वेदांमध्ये कोणत्याही अवताराची कथा नाही.. पण पुराणांमध्ये ती आली आहे.

आता १५४ वे पूर्ण सूक्त पाहू या.
विष्णो॒र्नु कं॑ वी॒र्या॑णि॒ प्र वो॑चं॒ यः पार्थि॑वानि विम॒मे रजां॑सि । यो अस्क॑भाय॒दुत्त॑रं स॒धस्थं॑ विचक्रमा॒णस्त्रे॒धोरु॑गा॒यः ॥१॥

प्र तद्विष्णुः॑ स्तवते वी॒र्ये॑ण मृ॒गो न भी॒मः कु॑च॒रो गि॑रि॒ष्ठाः । यस्यो॒रुषु॑ त्रि॒षु वि॒क्रम॑णेष्वधिक्षि॒यंति॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥२॥

प्र विष्ण॑वे शू॒षमे॑तु॒ मन्म॑ गिरि॒क्षित॑ उरुगा॒याय॒ वृष्णे॑ । य इ॒दं दी॒र्घं प्रय॑तं स॒धस्थ॒मेको॑ विम॒मे त्रि॒भिरित्प॒देभिः॑ ॥३॥

यस्य॒ त्री पू॒र्णा मधु॑ना प॒दान्यक्षी॑यमाणा स्व॒धया॒ मदं॑ति । य उ॑ त्रि॒धातु॑ पृथि॒वीमु॒त द्यामेको॑ दा॒धार॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥४॥

तद॑स्य प्रि॒यम॒भि पाथो॑ अश्यां॒ नरो॒ यत्र॑ देव॒यवो॒ मदं॑ति । उ॒रु॒क्र॒मस्य॒ स हि बंधु॑रि॒त्था विष्णोः॑ प॒दे प॑र॒मे मध्व॒ उत्सः॑ ॥५॥

ता वां॒ वास्तू॑न्युश्मसि॒ गम॑ध्यै॒ यत्र॒ गावो॒ भूरि॑शृंगा अ॒यासः॑ ।अत्राह॒ तदु॑रुगा॒यस्य॒ वृष्णः॑ पर॒मं प॒दमव॑ भाति॒ भूरि॑ ॥६॥

ह्या सूक्ताचा संक्षेपात अर्थ पहायचा म्हटला तर मी त्या विष्णूचे अर्थात सूर्याचे वर्णन करतो, ज्याने तीन पावलांत समग्र विश्व व्यापिले आहे व आकाशास स्थिर केले आहे; ज्याने पृथ्वी, द्युलोक व समस्त भुवनांस धारण करून ठेवलेले आहे. त्याने निर्माण केलेल्या औषधी, अन्नादींनी मनुष्याचे पोषण होते, त्यास मी वंदन करतो.

इथे विष्णू म्हणजे दुसरे कुणीही नसून तो सूर्य ह्या अर्थाने आहे. सूर्य तीन पावलांनी तीन भुवने व्यापितो, ह्याचाच अर्थ विष्णूची तीन पावले आहेत.

नकल-डकव संपले.

==बाह्यदुवे==
==बाह्यदुवे==

२१:००, ८ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले! बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले.

याच दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होतो. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतो. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.

दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल,अक्षता वाहून त्यांची पूजा होते.

आख्यायिका

हा असुरराज बली म्हणजे बळीराजा नव्हे. शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणजे खुद्द श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम हा आहे. त्याची हत्यारेसुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहेत. म्हणून "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे!

शेतकऱ्याचा मित्र बळीराजा म्हणजे बलराम...आपल्याकडे मुद्दाम काही जातिद्वेष्ट्यांनी असुरराज बळी हाच शेतकऱ्याचा मित्र असल्याचे खोटे पसरविले आणि बुद्धिभेद करायचा प्रयत्न केला. बलरामाच्या हाती नांगर आणि मुसळ ही शस्त्रे आहेत. तीच आयुधे शेतकऱ्याची असतात ना...? बळी, राम, बली, संकर्षण आदी अनेक नावांनी बलराम ओळखले जातात. इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो हे रोज सायंकाळी म्हटले जात असे, केवळ बलिप्रतिपदेच्या दिवशी नव्हे. पण ठासून खोटे बोलले व पसरविले जाते...बलराम हे द्वारकेचे महाराज होते. त्यांच्या काळात द्वारका हे संपन्न नगर होते. ते प्रजेची काळजी घेणारे होते. म्हणून त्यांचे राज्य येवो, ही प्रार्थना...पण आर्य-अनार्य सारखा जगात बाद झालेला इतिहास आपल्याकडे अद्याप चघळला जातो. त्यातून हे खोटे निपजते. प्रत्यक्ष भगवंत हे बलरामांची स्तुती करताना काय म्हणतात ते बघा, "आपले स्वरूप अखिल विश्वमय आहे. आपणच सर्व लोकांचा संहार केल्यावर नारायणरूपात स्थिर रहाता. आकाश आपले मस्तक, जल मूर्ती, पृथ्वी पाय, अग्नी मुख, जीवसृष्टीचा जीवनदायिनी वायू आपला उच्छवास आणि चंद्रमा आपले मन आहे. आपले सहस्र मुख, सहस्र शरीर, सहस्र हात-पाय आणि सहस्र नेत्र आहेत. आपण पूर्वकाळात जे दृश्यमान केले तेच देवता पाहत आले आहेत. विश्वात जे काही जाणण्यायोग्य आहे त्याचे आपणच प्रतिपादन केले आहे. एकमात्र आपल्याला जे तत्त्व माहिती आहे ज्याला देवतासुद्धा जाणत नाहीत. देवांनासुद्धा आपण पूर्णपणे कळला नाहीत म्हणून आपल्याला अनंत म्हटले जाते. आपणच सूक्ष्म, महान आणि एक आहात. जसा मी संपूर्ण विश्वाचा अंतर्यामी आहे तसेच आपणही आहात. मी सनातन विष्णू आणि तुम्ही पुरातन शेष आहात. जो मी आहे तेच तुम्ही आहात आणि जे तुम्ही आहात तो सनातन विश्वात्मा मीच आहे " [श्लोक ३५ ते ४८] (महाभारत- खिलभाग-हरिवंश - विष्णुपर्व-१४ वा अध्याय).

तेव्हा बळीराजा म्हणजे असुरराज बळी नसून द्वारकाधीपती बलराम आहेत हे समजून घ्यावे..!! . - सच्चिदानंद शेवडे गुरुजी

अन्यत्र वाचलेला आणि नकल-डकव केलेला मजकूर

एक असत्य सहस्रवेळा सांगितले की ते सत्य वाटायला लागते ह्या गोबेल्स तंत्राप्रमाणे एरवी सर्व धर्मेतिहास थोतांड असला तरी हेतुपुरस्सर प्रतिवर्षी दीपावली आली व पाडवा आला की बळी व वामनावताराची मूळची सूर्याची रूपक कथा, जी पुराणांनी अकारण ऐतिहासिक करून विपर्यस्त केली, त्या कथेंस आपल्या टिपिकल ब्रेकिंग इंडिया प्रक्रियेसाठी व फोडा नि झोडा ह्या अनीतीसाठी तिचा विपर्यांस करून ब्राह्मण-विरुद्ध ब्राह्मणेतर, तथाकथित बहुजन, आर्य-अनार्य वाद पेटवीत राहणे हे सांप्रतचे धंदे आपणांस समाजमाध्यमांतून तर नेहमीच पहायला मिळतात. त्यावर काहींनी तर म्हणे ग्रंथनिर्मितीही केली आहे.

वस्तुत: ह्या वामनाच्या कथेतल्या बळीराजाचा शेतकऱ्यांशी काडीमात्र संबंध नसताना तो जोडला जाऊन ह्या कथेतून ब्राह्मण वर्ग हा शेतकऱ्यांशीच द्रोही आहे असे ठसविण्याचा विकृत हेतु हल्लीच्या लेखनांतून सतत सुरू आहे.

शेतकऱ्याला बळीराजा म्हणायचेच असेल तर त्यांचा संबंध ज्यांच्या हातात आपण सदैव हल म्हणजे नांगर पाहतो, ज्यांची गदा व हल म्हणजे नांगर ही प्रमुख आयुधे आहेत, अशा.भगवान श्रीकृष्णांचे थोरले बंधू बलरामदादांशी जोडायला हवा आहे. पण हेतुपुरस्सर त्याचा संबंध बळी वामनाच्या कथेशी जोडून भेदनीती अवलंबिली जाती आहे. त्याचे खंडन करण्यासाठी व ह्या कथेचा नेमका परामर्श घेण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच !

वामनावताराची पुराणांतली कथा ही एका मूळ वैदिक रूपक कथेचे ऐतिहासिक अलंकारिक रूपांतर आहे.

पुराणांतली कथा आम्ही इथे सांगत बसत नाही ती सर्वांस परिचित आहे. तेव्हा ही कथा मूळची ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातली २२ व्या व १५४ व्या सूक्तांमधील ऋचेवरून घेतली आहे, तीत तो सूर्य अर्थात विष्णू ह्या तीन गोष्टींना आपल्या तीन पावलांत व्यापतो. ही तीन पावले म्हणजे दिवसाचे सकाळ, सायंकाळ व रात्र असे तीन भाग किंवा विश्वाचे पृथ्वी, आकाश व पाताळ असे तीन भाग ह्या अर्थाने आहे. ही सूर्यकिरणांनी व्यापिलेल्या ह्या तीन भागांची रूपक कथा ऋग्वेदामध्ये आहे. ह्या तीन पावलांत तो सूर्य अर्थात विष्णू सर्व विश्व व्यापितो. ते मूळ पाच मंत्र पाहू यात.

अतो॑ दे॒वा अ॑वंतु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे । पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः ॥१६॥
इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दं । समू॑ळ्हमस्य पांसु॒रे ॥१७॥
त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः । अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् ॥१८॥
विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥१९॥
तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यंति सू॒रयः॑ । दि॒वी॑व॒ चक्षु॒रात॑तं ॥२०॥
तद्विप्रा॑सो विप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते ।विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दं ॥२१॥

ह्या पाचही मंत्रांचा अर्थ सायण नावाच्या भाष्यकारानुसार सांगायचा तर विष्णूने अर्थात सूर्याने ह्या संसारास तीन पावलांनी व्यापले आहे. वेदांमध्ये कोणत्याही अवताराची कथा नाही.. पण पुराणांमध्ये ती आली आहे.

आता १५४ वे पूर्ण सूक्त पाहू या. विष्णो॒र्नु कं॑ वी॒र्या॑णि॒ प्र वो॑चं॒ यः पार्थि॑वानि विम॒मे रजां॑सि । यो अस्क॑भाय॒दुत्त॑रं स॒धस्थं॑ विचक्रमा॒णस्त्रे॒धोरु॑गा॒यः ॥१॥
प्र तद्विष्णुः॑ स्तवते वी॒र्ये॑ण मृ॒गो न भी॒मः कु॑च॒रो गि॑रि॒ष्ठाः । यस्यो॒रुषु॑ त्रि॒षु वि॒क्रम॑णेष्वधिक्षि॒यंति॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥२॥
प्र विष्ण॑वे शू॒षमे॑तु॒ मन्म॑ गिरि॒क्षित॑ उरुगा॒याय॒ वृष्णे॑ । य इ॒दं दी॒र्घं प्रय॑तं स॒धस्थ॒मेको॑ विम॒मे त्रि॒भिरित्प॒देभिः॑ ॥३॥
यस्य॒ त्री पू॒र्णा मधु॑ना प॒दान्यक्षी॑यमाणा स्व॒धया॒ मदं॑ति । य उ॑ त्रि॒धातु॑ पृथि॒वीमु॒त द्यामेको॑ दा॒धार॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥४॥
तद॑स्य प्रि॒यम॒भि पाथो॑ अश्यां॒ नरो॒ यत्र॑ देव॒यवो॒ मदं॑ति । उ॒रु॒क्र॒मस्य॒ स हि बंधु॑रि॒त्था विष्णोः॑ प॒दे प॑र॒मे मध्व॒ उत्सः॑ ॥५॥
ता वां॒ वास्तू॑न्युश्मसि॒ गम॑ध्यै॒ यत्र॒ गावो॒ भूरि॑शृंगा अ॒यासः॑ ।अत्राह॒ तदु॑रुगा॒यस्य॒ वृष्णः॑ पर॒मं प॒दमव॑ भाति॒ भूरि॑ ॥६॥
ह्या सूक्ताचा संक्षेपात अर्थ पहायचा म्हटला तर मी त्या विष्णूचे अर्थात सूर्याचे वर्णन करतो, ज्याने तीन पावलांत समग्र विश्व व्यापिले आहे व आकाशास स्थिर केले आहे; ज्याने पृथ्वी, द्युलोक व समस्त भुवनांस धारण करून ठेवलेले आहे. त्याने निर्माण केलेल्या औषधी, अन्नादींनी मनुष्याचे पोषण होते, त्यास मी वंदन करतो.

इथे विष्णू म्हणजे दुसरे कुणीही नसून तो सूर्य ह्या अर्थाने आहे. सूर्य तीन पावलांनी तीन भुवने व्यापितो, ह्याचाच अर्थ विष्णूची तीन पावले आहेत.

नकल-डकव संपले.

बाह्यदुवे

• http://www.marathimati.net/balipratipada/. Missing or empty |title= (सहाय्य)
• दीपावलीच्या पाच दिवसांचे महत्त्व ![मृत दुवा]