Jump to content

चर्चा:बलिप्रतिपदा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
@:,
याचे स्पष्टीकरण द्यावे.
अभय नातू (चर्चा) ०४:१७, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
मराठी विकिचे कठीण आहे ?? कृपया स्पष्ट करा. --Tiven2240 (चर्चा) ०५:५४, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@अभय नातू, Tiven2240, QueerEcofeminist, आणि V.narsikar: नकल डकव करणे तुलनेने किंबहुना खूपच सोपे काम आहे. परंतुसंपादक या शब्दाचा विचार करता आपल्या कामाचे जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करून मगच उचित ते करावे असे येथे अभिप्रेत आहे. त्यामुळे मराठी विकीचे कठीण आहे असे मलाही वाटते. येथे आपण एकत्वाने काम करीत नसून केवळ परस्पर कुरघोडी अनुभवाला येते. त्यामुळे प्रचालक यांनी सर्वच संपादकांना योग्य तो न्याय द्यायला हवा आहे अशी विनंती करावीशी वाटते. उदा. जे संपादक मनापासून प्रयत्न करून स्वभाषेत लिहीत असतात त्यांच्यावर या नकल डकव संपादक मंडळींचा त्रासच होणार. आपण किती मोठे योगदानकर्ते आहोत आणि किती वर्षे करीत आहोत यापेक्षा किती गुणवत्तेच्या निकषानुसार काम करीत आहोत हे लक्षात घ्यावे लागेल. ग्रामीण भागात मराठी विकीचा संदर्भ विद्यार्थी घेत असतात त्यामुळे प्रत्येक संपादक जागरूक असणे आवश्यक आहे. कधीही न दिसलेले संपादक अचानक सक्रिय होतात आणि लेखसंख्या मोठी दिसते तेंव्हाही त्यांच्या प्रत्येक लेखातील नकल डकव शोधायलाच हवी. आपण सर्वजण हे सकारात्मक पद्धतीने घ्याल आणि आवश्यक त्या सुधारणा आणि सहकार्य कराल अशी अपेक्षा करते. आपण इथे काम करीत असताना जात, धर्म, पंथ, लिंग आणि व्यक्तिगत संबंध या पलीकडे जाऊन तटस्थ वृत्तीने कंपूशाही सोडून काम केले पाहिजे. आर्या जोशी (चर्चा) ०८:३१, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]


ज्याअर्थी मजकुराची लांबी एवढी जास्त होती, त्याअर्थी तेथे नकल-डकव असणारच, यात संशोधन करायची गरज नव्हती. मुद्दा असा आहे की दर दिवाळीत बलिप्रतिपदेला बळी म्हणजॆ शेतकरी असे सांगून जी दिशाभूल चालते तिचा प्रतिवाद करणे. बळी हा शेतकरी नव्हता, तो असुर होता, हे एकदा मान्य केले की अशा नकल-डकवची गरज भासणार नाही. ... (चर्चा) ११:४२, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

ज,
मराठी विकिपीडिया हा समाजप्रबोधनाचा मंच नाही. त्यासाठी अनेक ब्लॉगस्थळे उपलब्ध आहेत. तुम्ही येथे सत्य जरुर मांडू शकता, अर्थात, संदर्भांसह.
नकल-डकव केल्याबद्दल तुम्हाला एकदा तात्पुरते अवरुद्ध केले गेले होते. या संपादनाने तुम्ही पुन्हा एकदा त्या सीमारेषेवर आहात असे खेदाने सांगावे लागते आहे.
पाहिजे ते बदल कराल ही अपेक्षा.
अभय नातू (चर्चा) १०:४५, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@अभय नातू:, मी हे मजकुर व अवहाल तपासले आहे. त्यात काहीही नकल डकव झालेले नाही. ज यांचे संपादन दिनांक ८ नोव्हेंबर २०१८ आहे. हे ब्लॉग पोस्ट वर असलेली दिनांक ही नकली आहे. हे ब्लॉग १५-११-२०१८ रोजी तयार करण्यात आले आहे. व वरील मजकुर फेसबुक वर सापडले नाही. याची पुष्टी या संकेतस्थळानी केली आहे. कृपया याची नोंद घ्यावी. लेखातील हटवलेले मजकुर पुन्हा प्रकाशित करा व यावर आपले मत नोंदवा. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १२:०१, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@अभय नातू:कृपया वरील नोंद व दुवे तपासा. आपण मजकुर का झाकले? स्पष्ट नोंद केली आहे की उल्लंघन झालेले नाही --Tiven2240 (चर्चा) ११:५०, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]



@अभय नातू, Tiven2240, , आणि V.narsikar:

  • इथे श्री ज यांनी आपल्याला विचार करायला वाव ठेवलेलाच नाहीये, त्यांनी स्वत:च मजकूराच्या खाली आणि वर नकल-डकव केलेला मजकूर असा उल्लेख व इतरत्र सापडलेला मजकूर असा उल्लेख केलेला आहे. अर्थात तो मराठीत आहे त्यामुळे मराठी निटसे न समजणारे सदस्य ते समजू शकणार नाहीत.
  • पण हा उत्पात कुणाच्याच लक्षात आला नाही, किंबहुना लक्षात येऊन लक्ष दिले गेले नाही अशी शंका येण्यास पूर्ण वाव आहे.
  • शिवाय, अनेकदा सुचना/ताकीद/विनंत्या करूनही जर ज हे असे उत्पात करणार असतील आणि त्यावर काहीच कारवाई होणार नसेल तर, खरोखर आता परत इतर मार्ग चोखंदळायची वेळ आलेली आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:२८, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
कृपया व्यक्तिगत हल्ले करू नये --Tiven2240 (चर्चा) १२:४३, २९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
@QueerEcofeminist:,
१. ज यांच्यावर सूचना व ताकीद पासून अवलंबनापर्यंतच्य कारवाया झालेल्या आहेत.
२. तुमच्याकडून अनेकदा ज यांच्यावर कारवाई करा नाहीतर... असा प्रचालकांवर संदेश वजा दबाव येत आहे. कृपया ते थांबवावे. प्रचालकांकडून भेदभाव होत आहे असे तुम्ही आणि काही विशिष्ट सदस्य आडून सुचवित आहात हे ही पाहिले. हे साफ चूक आहे.
३. येथील तुमच्या एकूण चर्चा पाहिल्या असत तुम्ही ज आणि Tiven2240 यांच्या प्रत्येक कामात सारखे उणेदुणे काढण्यात आणि/किंवा त्यांच्यावर उघड किंवा खोचक हल्ले करण्यात आपला वेळ खर्च करीत आहात हे पाहून खेद होतो.
अभय नातू (चर्चा) १०:४५, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
अन्यत्र वाचलेला आणि नकल-डकव केलेला मजकूर ......नकल-डकव संपले असे शिर्षक देऊन मजकूर चिटकवून प्रताधिकार भंग करणे हे जर ज यांचे काम असेल तर त्यात नक्कीच मी उणेदुणे काढणार आहे. आणि प्रताधिकारभंगाविरुद्ध कारवाईची मागणी सतत करणार आहे. त्यात गैर वाटत असेल तर आपणच प्रताधिकार भंगाविषयी काय स्वरुपाची कारवाई अपेक्षित आहे याची पुन्हा एकदा चर्चा घडवून आणावी. किंवा विकि फ़ौंडेशनची मार्गदर्शक तत्वे तपासावित.

शिवाय ज यांची नकल-डकव ही नुसता प्रताधिकार भंग नसून अनेकदा उत्पात असते. हे नोंदवूनही जर मलाच समज दिली जात असेल तर, आपल्या सृजनात्मक संपादने आणि उत्पात ह्यांच्या व्याख्या नक्कीच तपासायची वेळ झालेली आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ११:१६, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

अन्यत्र वाचलेला आणि नकल-डकव केलेला मजकूर ......नकल-डकव संपले असा मजकूर चिटकवून प्रताधिकार भंग करणे हे जर ज यांचे काम असेल ... यातून ज हे कायम असे मथळे देत नकल-डकव करतात आणि प्रचालक त्याकडे दुर्लक्ष करतात असे तुम्ही ध्वनित करीत आहात. कृपया असे गैरसमज वाढवू नका.
हा प्रकार एकदा (येथे) झालेला आहे. त्याबद्दल ज यांना ताकीद दिली आहे हे पाहिले असेलच. इतरत्र झालेल्या नकल-डकवीबद्दल कारवाई केल्याचे वर लिहिले आहेच.
तुम्हाला समज (हा तुमचा शब्द, माझा नव्हे) दिली जात नसून तुमच्या संपादनातून काय दिसते हे तुम्हाला सांगत आहे. तुमच्या सततच्या त्याच त्या मागण्या, त्याही विशिष्ट सदस्यांविरुद्ध, यांतून तुमचा व्यक्तिद्वेष दिसू शकतो (असे नाही आहे असा भाबडा समज मी करुन घेत आहे.) त्याकडे दुर्लक्ष करीत जग (किमानपक्षी प्रचालक) विरुद्ध मी असा पवित्रा घेऊ नये.
तुम्ही ज्याला उत्पात म्हणत आहात (इतरांनी लिहिलेल्या लेखांत बदल करणे) ही वागणूक अनेक सदस्यांकडून अनेकदा होते, तीसुद्धा मराठी विकिपीडियाच्या भल्याकरिता. तेथेही तुम्ही विशिष्ट सदस्य स्त्रीयांच्या संपादनात लुडबुड करतात म्हणजेच उत्पात करतात हा पवित्रा घेतलात. थोडेसे वस्तुनिष्ठ संशोधन केल्यास हाच प्रकार तुमच्यासह अनेकांकडून होतो. केवळ लेखांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे केले जाते असे तुम्ही कबूल कराल ही खात्री आहे.
अभय नातू (चर्चा) ११:३४, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
@अभय नातू: मी आत्ताच ज यांनीच इतर ठिकाणी केलेला प्रताधिकार भंग नॊंदवला आहे. त्याकडे लक्ष द्यावे.
    • शिवाय तुमच्या सकट इतर सगळे अशी शिर्षके देत नकल-डकव करतात असे तुमचे म्हणणे आहे? अन्यत्र वाचलेला आणि नकल-डकव केलेला मजकूर ......नकल-डकव संपले आणि ते योग्य आहे?
    • असे प्रत्येक स्त्री सदस्याचे तपासल्यास स्पष्टच दिसते. आता तुम्हांला पुरावे नाकारायचे असतील तर त्याला मी काहीही करू शकत नाही. त्याची पूर्ण चर्चा होऊन, पुरावे देऊनही तुम्ही वास्तव नाकारलेले आहे.
    • आपला तो बाळा आणि दुसर्याचे ते कार्ट अशीच अवस्था आहे इथे, मलाच समज देण्यात सगळे गुंतलेले. म्हणजे उत्पात चालतो, प्रताधिकार भंग चालतो, वैयक्तिक हल्ले चालतात. पण नियम अवलंबायला मागितलं की मलाच समज, आणि मी मागणी करतोय आणि त्यावर वेळ घालवतोय ह्यावर दु:ख? QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ११:५३, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
१. लक्ष दिले आहे. पुढील कारवाई करीत आहे.
२. ज यांनी फक्त स्त्री सदस्यांच्याच लेखांत बदल केले असे नाही. स्त्री सदस्यांच्या लेखांत फक्त ज यांनीच बदल केले असेही नाही. तुम्ही स्त्री सदस्यांच्या लिखाणात केलेले बदल तुम्हाला (शोधल्यास) सापडतीलच. ज यांनी पुरुष सदस्यांच्या लिखाणात केलेले बदलही तुम्हाला (शोधल्यास) सापडतीलच. तुम्ही दुबळे, सेल्फ-सर्व्हिंग पुरावे देत पुरावे नाकारायचे असतील वगैरे आततायी भाषा वापरता आहात. पुन्हा एकदा जग विरुद्ध मी हाच पवित्रा.
३. आपला तो बाळा आणि दुसऱ्याचे ते कार्टे हा अनाठायी आरोप करुन त्यात मला विनाकारण गोवता आहात. मागील संपादने तपासली असता जवळजवळ प्रत्येक सदस्याला मी वेळ आणि प्रसंगाप्रमाणे समज (पुन्हा एकदा, तुमचा शब्द) दिलेली आहे हे उघड आहे, अगदी येथे उदाहरण असलेल्या सदस्य ज यांना सुद्धा. पुन्हा एकदा कोंबडे झाकण्याचा प्रयत्न का करीत आहात?
४. तुमच्या लिखाणाकडे अनेकदा दुर्लक्ष करीत मी योग्य ती संपादने केली आहेत. आज तुम्हाला हटकले इतकेच. आता तुमची सूचना शिरोमान्य समजून आजचा उरलेला वेळ इतर आणि इतरत्र, अधिक उपयोगी संपादनांत घालवेन.
अभय नातू (चर्चा) १२:०७, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]
हे इंटरअकॅशन वाले जे दुवा आपण दिले आहे ते साधन विकिपीडियावर कळसुत्री बाहुले शोधण्यासाठी वापरले जाते. त्याचे इथे का उल्लेख केले आहे? --Tiven2240 (चर्चा) १२:३९, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]