"मास्टर कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ७१: | ओळ ७१: | ||
* संगीत नाटक अकादमी फेलोशिप |
* संगीत नाटक अकादमी फेलोशिप |
||
* [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक |
* [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक |
||
* जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर.कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आजे. |
* जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर.कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आजे. |
||
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेच्या वतीने मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार देण्यात येतो; २०१६ सालचा पुरस्कार सरदार मुजुमदार यांच्या ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथाला देण्यात आला. |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२२:५५, २८ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मास्टर कृष्णराव | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | जानेवारी २०, १८९८ |
जन्म स्थान | आळंदी, पुणे, भारत |
मृत्यू | ऑक्टोबर २०, १९७४ |
मृत्यू स्थान | पुणे, भारत |
मृत्यूचे कारण | वृद्धापकाळ |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
संगीत साधना | |
गुरू | पं. भास्करबुवा बखले |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्तर कृष्णराव (जानेवारी २०, १८९८ - ऑक्टोबर २०, १९७४) हे हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील गायक व मराठी संगीतनाटकांमधील गायक-अभिनेते होते. भास्करबुवा बखल्यांचे ते शिष्य होते.
पूर्वायुष्य
मास्तर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यात आळंदी येथे झाला. त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशी झाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. इ.स. १९१० मध्ये मास्तर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले.
सांगीतिक कारकीर्द
आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या.
गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली.
मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या.
संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी इ.स. १९२२ ते इ.स. १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे इ.स. १९४० ते इ.स. १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.
वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली.
पुणे येथे ऑक्टोबर २०, इ.स. १९७४ रोजी त्यांचे निधन झाले.
मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो.
सन्मान व पुरस्कार
- 'संगीत कलानिधी' ही पदवी
- पद्मभूषण पुरस्कार, भारत सरकार
- संगीत नाटक अकादमी फेलोशिप
- बालगंधर्व सुवर्ण पदक
- जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर.कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आजे.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार देण्यात येतो; २०१६ सालचा पुरस्कार सरदार मुजुमदार यांच्या ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथाला देण्यात आला.
बाह्य दुवे
- मास्टर कृष्णराव (इंग्रजी मजकूर) विदागारातील आवृत्ती
- इंडिया नेट झोन संस्थळ(इंग्रजी मजकूर)
- ७८ आर पी एम ध्वनिमुद्रिकांची यादी