"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
|||
ओळ ८८: | ओळ ८८: | ||
एक गायक म्हणून ''बाबूजीं''नी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील काही चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत : |
एक गायक म्हणून ''बाबूजीं''नी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील काही चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत : |
||
* ''अंतरीच्या |
* ''अंतरीच्या गूुढ गर्भी'' (भावगीत) |
||
* ''अशी पाखरे येती'' |
* ''अशी पाखरे येती'' (भावगीत) |
||
* ''आकाशी झेप घेरे पाखरा'' |
* ''आकाशी झेप घेरे पाखरा'' (चित्रपट आराम हराम आहे) |
||
* ''ऊठ ऊठ पंढरीनाथा'' |
* ''ऊठ ऊठ पंढरीनाथा'' (चित्रपट झाला महार पंढरीनाथ) |
||
* ''कुठे शोधिसी रामेश्वर'' |
* ''कुठे शोधिसी रामेश्वर'' (भावगीत) |
||
* ''जग हे बंदीशाळा'' |
* ''जग हे बंदीशाळा'' (चित्रपट जगाच्या पाठीवर) |
||
* ''डाव मांडून मांडून मोडू नको'' |
* ''डाव मांडून मांडून मोडू नको'' (भावगीत) |
||
* ''तुज सगुण म्हणू की निर्गुण रे'' |
* ''तुज सगुण म्हणू की निर्गुण रे'' (संत-गीत) |
||
* ''तुझे गीत गाण्यासाठी'' |
* ''तुझे गीत गाण्यासाठी'' (भावगीत) |
||
* ''तुझे रूप चित्ती राहो'' |
* ''तुझे रूप चित्ती राहो'' (चित्रपट गोरा कुंभार) |
||
* ''तोच चंद्रमा नभात'' |
* ''तोच चंद्रमा नभात'' (भावगीत) |
||
* ''दिसलीस तू फुलले ऋतू'' |
* ''दिसलीस तू फुलले ऋतू'' (भावगीत) |
||
* ''देव देव्हाऱ्यात नाही'' |
* ''देव देव्हाऱ्यात नाही'' (चित्रपट झाला महार पंढरीनाथ) |
||
* ''देवा तुला दया येईना कशी'' |
* ''देवा तुला दया येईना कशी'' |
||
* ''देहाची तिजोरी'' |
* ''देहाची तिजोरी'' (चित्रपट आम्ही जातो अमुच्या गावा) |
||
* ''धीरे जरा गाडीवाना'' |
* ''धीरे जरा गाडीवाना'' |
||
* ''नवीन आज चंद्रमा'' |
* ''नवीन आज चंद्रमा'' (चित्रपट उमज पडेल तर) |
||
* ''प्रिया आज माझी नसे साथ द्याया'' |
* ''प्रिया आज माझी नसे साथ द्याया'' (भावगीत) |
||
* ''बाई मी विकत घेतला शाम'' |
* ''बाई मी विकत घेतला शाम'' (चित्रपट जगाच्या पाठीवर) |
||
* ''बोलत नाही वीणा'' |
* ''बोलत नाही वीणा'' (चित्रपट पडदा) |
||
* ''मानवतेचे मंदिर माझे'' |
* ''मानवतेचे मंदिर माझे'' |
||
* ''यशवंत हो जयवंत हो'' |
* ''यशवंत हो जयवंत हो'' (भिंतीलाा कान असतात) |
||
* ''लाडकी शकुंतला'' |
* ''लाडकी शकुंतला'' |
||
* ''वज्र चुड्याचे हात जोडता'' |
* ''वज्र चुड्याचे हात जोडता'' |
||
* ''विठ्ठला तू वेडा कुंभार'' |
* ''विठ्ठला तू वेडा कुंभार'' (चित्रपट प्रपंच) |
||
* ''सखी मंद झाल्या तारका'' |
* ''सखी मंद झाल्या तारका'' (भावगीत) |
||
* ''स्त्री जन्मा ही तुझी कहाणी'' |
* ''स्त्री जन्मा ही तुझी कहाणी'' (चित्रपट बाळा जो जो रे) |
||
* ''स्वर आले |
* ''स्वर आले दुरूनी'' (भावगीत) |
||
===[[गीतरामायण]]=== |
===[[गीतरामायण]]=== |
२१:१०, २० सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
सुधीर फडके | |
---|---|
चित्र:सुधीर फडके.jpg सुधीर फडके | |
जन्म नाव | रामचंद्र विनायक फडके |
टोपणनाव | बाबूजी |
जन्म |
जुलै २५, १९१९ कोल्हापूर, महाराष्ट्र |
मृत्यू |
जुलै २९, २००२ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | संगीत, गायन, चित्रपटनिर्मिती |
संगीत प्रकार | चित्रपटसंगीत, स्वतंत्र रचना |
प्रसिद्ध रचना | गीतरामायण |
पत्नी | ललिता फडके |
अपत्ये | श्रीधर फडके |
पुरस्कार |
राष्ट्रपती पदक सह्याद्री स्वररत्न पुरस्कार |
सुधीर फडके (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते बाबूजी या नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे.
जीवन
बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात १९४१ साली एच्.एम्.व्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या 'प्रभात चित्र संस्थे'त संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.
त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.
आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट.
कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.
कारकीर्द
संगीतकार
बाबूजींनी एकूण १११ चित्रपटांना संगीत दिले. त्यांपैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे :
- गोकुळ (१९४६)
- आगे बढो (१९४७)
- सीता स्वयंवर (१९४८)
- अपराधी (१९४९)
- जय भीम (१९४९)
- माया बाजार (१९४९)
- राम प्रतीज्ञा (१९४९)
- संत जनाबाई (१९४९)
- श्री कृष्ण दर्शन (१९५०)
- मालती माधव (१९५१)
- मुरलीवाला (१९५१)
- पहली तारीख (१९५४)
- रत्न घर (१९५४)
- शेवग्याच्या शेंगा (१९५५)
- देवघर (१९५६)
- सजनी (१९५६)
- गज गौरी (१९५८)
- गोकुल का चोर (१९५९)
- भाभी की चूडियां (१९६१)
- प्यार की जीत (१९६२)
- एकटी (१९६८)
- आधार (१९६९)
- दरार (१९७१)
- शेर शिवाजी (१९८१)
- रुक्मिणी स्वयंवर
- आम्ही जातो आमुच्या गावा
- पुढचे पाऊल
- जगाच्या पाठीवर
- सुवासिनी
- प्रपंच
- मुंबईचा जावई
गायक
एक गायक म्हणून बाबूजींनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील काही चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत :
- अंतरीच्या गूुढ गर्भी (भावगीत)
- अशी पाखरे येती (भावगीत)
- आकाशी झेप घेरे पाखरा (चित्रपट आराम हराम आहे)
- ऊठ ऊठ पंढरीनाथा (चित्रपट झाला महार पंढरीनाथ)
- कुठे शोधिसी रामेश्वर (भावगीत)
- जग हे बंदीशाळा (चित्रपट जगाच्या पाठीवर)
- डाव मांडून मांडून मोडू नको (भावगीत)
- तुज सगुण म्हणू की निर्गुण रे (संत-गीत)
- तुझे गीत गाण्यासाठी (भावगीत)
- तुझे रूप चित्ती राहो (चित्रपट गोरा कुंभार)
- तोच चंद्रमा नभात (भावगीत)
- दिसलीस तू फुलले ऋतू (भावगीत)
- देव देव्हाऱ्यात नाही (चित्रपट झाला महार पंढरीनाथ)
- देवा तुला दया येईना कशी
- देहाची तिजोरी (चित्रपट आम्ही जातो अमुच्या गावा)
- धीरे जरा गाडीवाना
- नवीन आज चंद्रमा (चित्रपट उमज पडेल तर)
- प्रिया आज माझी नसे साथ द्याया (भावगीत)
- बाई मी विकत घेतला शाम (चित्रपट जगाच्या पाठीवर)
- बोलत नाही वीणा (चित्रपट पडदा)
- मानवतेचे मंदिर माझे
- यशवंत हो जयवंत हो (भिंतीलाा कान असतात)
- लाडकी शकुंतला
- वज्र चुड्याचे हात जोडता
- विठ्ठला तू वेडा कुंभार (चित्रपट प्रपंच)
- सखी मंद झाल्या तारका (भावगीत)
- स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (चित्रपट बाळा जो जो रे)
- स्वर आले दुरूनी (भावगीत)
सुधीर फडके यांच्या कारकीर्दीतील मानाचा बिंदू म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेले गदिमांचे गीतरामायण. गीतरामायणात एकूण ५६ गाणी आहेत. त्यामध्ये गदिमांनी रामायणातले सर्व प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णिले आहेत.
गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, असामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात.
बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी स्वदेशात तसेच परदेशांत केले.
पुरस्कार
१. राष्ट्रपती पदक (१९६३) - हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी.
२. सह्याद्री स्वररत्न पुरस्कार (२००२)
३. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९८)
४. लता मंगेशकर पुरस्कार (२००१)
५. अल्फा जीवन गौरव पुरस्कार (२००१)
चरित्रग्रंथ
- स्वरश्री बाबूजी : लेखक वसंत वाळुंजकर