किराणा घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किराणा घराणा या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंदुस्तानी शास्त्रीय रागसंगीताचा मूळ गाभा तसाच ठेवून संगीत सादर करण्याच्या परंपरागत आणि विविध पद्धतींमुळे या संगीतात काही घराणी निर्माण झाली आहेत. त्यांपैकी किराणा (मूळ नाव कैराना) हे एक प्रमुख घराणे आहे.

इतिहास[संपादन]

इसवी सनाच्या १३ च्या शतकात महाराष्ट्रातील औरंगाबादजवळच्या देवगिरी शहरात यादवांचे राज्य होते. त्यावेळी रामदेवराव यादव यांच्या दरबारात गोपाल नायक नावाचे एक ध्रुपद गाणारे गायक होते. दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा देवगिरी जिंकले तेव्हा त्याने देवगिरीच्या दरबारातील अनेक संगीततज्ज्ञांना पळवून दिल्लीला नेले. त्यांपैकी असलेले एक गोपाळ नायक, हे किराणा घराण्याचे आद्य संस्थापक.

त्यांचे शिष्य भन्नू नायक आणि धोंडू नायक. घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे गायक ग़ुलाम अली और ग़ुलाम मौला हे होते, तर चौथ्या पिढीत आले उस्ताद बंदे अली खान.. किराणा घराण्याचे प्रवर्तक समजले जाणारे उस्ताद अब्दुल करीम खान हे गोपाळ नायक यांनी निर्माण केलेल्या संगीत परंपरेतील पाचव्या पिढीवे गायक.

उस्ताद अब्दुल करीम खान, हे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरजवळच्या शामली जिल्ह्यातील कैराना नावाच्या गावाचे रहिवासी होते. त्यावरून या घराण्याचे नाव कैराना पडले. मात्र, पुढे हे घराणे ’किराणा’ (हिंदीत किराना) या नावाने प्रसिद्धीस आले.

याच घराण्यात सवाई गंधर्व, केसरबाई केरकर, रोशन‍आरा बेगम, बेगम अख्तर वगैरे गायक झाले.

या घराण्यातील प्रसिद्ध गायक[संपादन]

पुस्तके[संपादन]

  • किराणा घराणे परंपरा आणि प्रवाह (लेखक - डॉ. अतींद्र सरवडीकर)