"मोगूबाई कुर्डीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ४९: ओळ ४९:


{{हिंदुस्तानी संगीत}}
{{हिंदुस्तानी संगीत}}
{{DEFAULTSORT:कुर्डीकर,मोगूबाई}}


[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]

०५:१२, ९ जून २०११ ची आवृत्ती

चित्र:मोगूबाई कुर्डीकर.jpg

साचा:भारतीय शास्त्रीय गायक

मोगूबाई कुर्डीकर (१५ जुलै, इ.स. १९०४ - १० फेब्रुवारी, इ.स. २००१) या हिंदुस्तानी संगीत गायिका होत्या. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्यांना आग्रा घराणेजयपूर घराणे ह्या दोन मातब्बर संगीत घराण्यांकडून संगीत शिकायला मिळाले.

पूर्वायुष्य

गोवा राज्यातील कुर्डी या गावी एका मराठा गोमंतक समाजातील कलावंत परिवारात मोगूबाईंचा जन्म झाला. लहानपणी त्यांना 'मोगू' या नावाने संबोधत असत. त्यांच्या आईने त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी गाणे शिकण्यासाठी जांबवली गावातील देवळात आलेल्या हरिदास साधूंकडे पाठविले व नंतर मोगूबाई व त्यांची आई जयश्रीबाई 'चंद्रेश्वर भूतनाथ संगीत मंडळी'त नोकरी करू लागल्या. मायलेकींनी 'भक्त ध्रुव', 'भक्त प्रल्हाद' अशा अनेक नाटकांत भूमिका केल्या व पदे गायली. तिथे मोगूबाई काम करत असताना त्यांच्या आईचा देहांत झाला. पुढे ती संगीत मंडळी बुडीत निघाल्यावर मोगूबाईंनी 'सातारकर स्त्री संगीत मंडळी' ह्या नाटक कंपनीत काम सुरू केले. तिथे त्यांनी 'पुण्यप्रभाव' संगीतिकेत 'किंकिणी'ची भूमिका, 'सुभद्रा' नाटकात 'सुभद्रे'ची भूमिका अशा अनेक भूमिका केल्या. त्यांना ती नोकरी सोडावी लागली. काही काळ त्यांचे वास्तव्य सांगली येथे होते. तिथे त्यांना इनायत खान यांनी संगीत शिकविले, परंतु काही काळाने ते खंडितही केले. सांगली येथेच मोगूबाईंचा उस्ताद अल्लादिया खान यांच्याशी परिचय झाला व त्या खानसाहेबांकडे संगीत शिकू लागल्या. पुढे संगीत शिक्षणाच्या ध्यासाने त्या मुंबईस येऊन पोहोचल्या. उस्ताद अल्लादिया खान यांच्यानंतर त्यांना उस्ताद बशीर खानविलायत हुसैन खान ह्या आग्रा घराण्यातील विख्यात गायकांचे मार्गदर्शनही लाभले. नंतर त्या पुन्हा उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे जयपूर घराण्याच्या शैलीतील गायनाची साधना करू लागल्या.

सांगीतिक कारकीर्द

मोगूबाईंची गायकी ही लयकारी व बोलतानांवर आधारलेली होती. स्वर व लयीची सुंदर गुंफण त्यांच्या गायनात आढळत असे. त्यांच्या गायन कार्यक्रमांना व मैफिलींना रसिकांची दाद मिळाली. त्यांच्या गायनाची अनेक ध्वनिमुद्रणेही उपलब्ध आहेत.

पुरस्कार व सन्मान

इ.स. १९६९ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच भारत सरकारने इ.स. १९७४ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. इ.स. १९८० मध्ये त्यांना संगीत संशोधन अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. इ.स. १९७६ मध्ये त्या गोवा येथे भरलेल्या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेच्या अध्यक्षपदी होत्या.

वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी इ.स. २००१ मध्ये त्यांचे निधन झाले.

शिष्य

मोगूबाईंनी अनेक समर्थ शिष्यांना गायनकलेत तयार केले. त्यांत प्रामुख्याने त्यांच्या कन्या गानसरस्वती किशोरी आमोणकर, सुशीलाराणी पटेल, कमल तांबे, कौसल्या मंजेश्वर, सुहासिनी मुळगांवकर, पद्मा तळवलकर, बबनराव हळदणकर, अरुण द्रविडवामनराव देशपांडे यांचा समावेश होतो.

बाह्य दुवे