"किशोरी आमोणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७४: ओळ ७४:
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]


[[en:Kishori Amonkar]]
[[en:Kishori Amonkar]]

२१:३४, २९ मे २०११ ची आवृत्ती

किशोरी आमोणकर या (१० एप्रिल, इ.स. १९३१ - हयात) ह्या हिंदुस्तानी संगीत गायिका असून जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करतात. त्या एक श्रेष्ठ गायिका आहेत व आदराने त्यांना 'गानसरस्वती' असे संबोधले जाते.

पूर्वायुष्य

किशोरीताईंचा जन्म मुंबई येथे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर व माधवदास भाटिया यांचे पोटी झाला. त्यांनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरुंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचे पती रवी आमोणकर हे व्यवसायाने अध्यापन क्षेत्रात होते. इ.स. १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले. किशोरी ताईंना दोन मुले आहेत. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त आहेत.


सांगीतिक कारकीर्द

किशोरीताईंनी हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' (इ. स. १९६४) साठी पार्श्वगायन केले आहे. त्यांनी इ.स. १९५० चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. इ.स. १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले आहे. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करतात. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावले जाते. त्यांनी 'स्वरार्थरमणी - रागरससिद्धांत' हे पुस्तक लिहिले आहे.


शिष्य

माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांसह अनेक कलावंत किशोरीताईंच्या शिष्यवर्गांत मोडतात.


पुरस्कार व सन्मान

संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. १९८५.

संगीत नाटक अकादमी फेलोशिप, इ.स. २००९.

पद्मभूषण पुरस्कार, इ.स. १९८७.

पद्मविभूषण पुरस्कार, इ.स. २००२.

संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, इ.स. २००२.

संगीत सम्राज्ञी पुरस्कार, इ.स. १९९७.


ध्वनिमुद्रिकांची यादी

  • राग
  • मल्हार मालिका
  • म्हारो प्रणाम
  • घट घट में पंछी बोलता
  • प्रभात
  • समर्पण
  • संप्रदाय
  • बॉर्न टू सिंग
  • लाइव्ह इन लंडन


बाह्य दुवे