जून ११
Appearance
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६२ वा किंवा लीप वर्षात १६३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७८८ - रशियाचा शोधक गेरासिम इझ्माइलोव्ह अलास्काला पोचला.
एकोणविसावे शतक
[संपादन]- १८०५ - डेट्रॉइट शहर आगीत जवळजवळ नष्ट.
- १८६६ - अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
- १९०१ - न्यू झीलंडने कूक द्वीपे बळकावली.
- १९०७ - नॉर्धॅम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.
विसावे शतक
[संपादन]- १९१७ - पहिले महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या दबावाखाली ग्रीसचा राजा कॉन्स्टन्टाईनने पदत्याग केला. त्याचा मुलगा अलेक्झांडर राजेपदी.
- १९३५ - एडविन आर्मस्ट्रॉंगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
- १९३७ - जोसेफ स्टालिनने आपल्याच आठ लश्करी अधिकाऱ्यांना ठार करवले.
- १९३८ - दुसरे चिनी-जपानी युद्ध - चालून येणाऱ्या जपानी सैन्याला रोखण्यासाठी चीनने यांगत्से नदीला कृत्रिम पूर आणला. यात ५,००,००० ते ९,००,००० नागरिक मारले गेले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने लेंड लीझ अंतर्गत सोवियेत संघाला मदत पाठवण्याचे ठरवले.
- १९५५ - ल मान्स शर्यतीत दोन गाड्यांची टक्कर झाली. या अपघातात ८३ प्रेक्षक ठार तर १०० जखमी झाले.
- १९६२ - फ्रॅंक मॉरिस, जॉन ॲंग्लिन व क्लॅरेन्स ॲंग्लिननी आल्कात्राझ बेटावरील तुरुंगातून पलायन केले. या तुरुंगातून कैदी पळण्याची ही एकमेव घटना आहे
- १९६३ - दोन श्यामवर्णीय विद्यार्थ्यांना अलाबामा विद्यापीठात शिरु न देण्याकरता अलाबामा राज्याचा गव्हर्नर जॉर्ज वॉलेस स्वतः दारात उभा राहिला.
- १९६४ - जर्मनीच्या कोलोन शहरातील प्राथमिक शाळेत वॉल्टर सायफर्टने धुमाकूळ घातला. आठ विद्यार्थी व दोन शिक्षक ठार.
- १९७० - ऍना मे हेस व एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
- १९७२ - दारू पिउन रेल्वे गाडी चालवण्याऱ्यां चालकामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात. सहा ठार, १२६ जखमी.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - ओक्लाहोमा सिटीतील बॉम्बस्फोट घडवून आणण्याबद्दल टिमोथी मॅकव्हेला मृत्युदंड.
- २००४ - कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिच्या उपग्रह फीबीच्या जवळून पसार झाला.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- १९२४ - वासुदेवशास्त्री खरे, इतिहास संशोधक व नाटककार.
- १९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी, बालसाहित्यिक, समाजवादी नेता आणि स्वातंत्र्य सैनिक.
- १९८३ - घनश्यामदास बिर्ला, भारतीय उद्योगपती.
- २००० - राजेश पायलट, कॉॅंग्रेस नेता व केंद्रीय मंत्री.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जून ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)