ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोट अमेरिकेच्या ओक्लाहोमा सिटी शहरात दहशतवाद्यांनी १९ एप्रिल, १९९५ रोजी घडवून आणलेला मोठा बॉम्बहल्ला होता. एक ट्रक भरुन विस्फोटके वापरुन केलेल्या या हल्ल्यात १६८ व्यक्ति मृत्युमुखी पडल्या आणि इतर ६८० जखमी झाल्या. टिमोथी मॅकव्हे आणि टेरी निकोल्स या दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यात एफ.बी.आय.ची आल्फ्रेड पी. मराह बिल्डिंगचा तिसरा भाग नष्ट झाला आणि जवळपासच्या ३२४ इमारतींना धक्का बसला. या प्रचंड हल्ल्या २५८ इतर इमारतींवरील काचा फुटल्या आणि ८६ मोटारकार जळून गेल्या. या एका हल्ल्यात ६५ कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त नुकसान झाल्य्चा अंदाज आहे.

स्थानिक दहशतवाद्यांनी अमेरिकेवर केलेला हा सर्वाधिक जीवघेणा हल्ला आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.