Jump to content

"रिडल्स इन हिंदुइझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६: ओळ ६:


त्यानंतर मात्र सर्व रिपब्लिकन नेते, बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांनी एकत्रित बसून "या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी सरकार सहमत असेलच असे नाही", अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]] मध्ये रिडल्स इन हिंदुइझम हा चौथा खंड आहे.<ref>https://www.loksatta.com/mumbai-news/riddles-in-hinduism-in-marathi-1057448/</ref>
त्यानंतर मात्र सर्व रिपब्लिकन नेते, बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांनी एकत्रित बसून "या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी सरकार सहमत असेलच असे नाही", अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]] मध्ये रिडल्स इन हिंदुइझम हा चौथा खंड आहे.<ref>https://www.loksatta.com/mumbai-news/riddles-in-hinduism-in-marathi-1057448/</ref>

== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]

== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ]]
[[वर्ग:दलित इतिहास]]

११:३८, १ मार्च २०२० ची आवृत्ती


रिडल्स इन हिंदुइझम (मराठी: हिंदू धर्मातील कोडे) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक इंग्लिश पुस्तक आहे. इ.स. १९५६ च्या सप्टेंबर महिन्यात आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. त्यांना त्या ग्रंथात काही फेरफार करायचे होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.[] डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे मध्ये रिडल्स इन हिंदुइझम हा चौथा खंड आहे.[]

पुस्तक प्रकाशनावरुन वाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुइझम या इंग्रजी ग्रंथाने १९८७-८८ च्या दरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता. या ग्रंथात रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन दैवी व्यक्तीमत्वाची कठोर तर्कशुद्ध चिकित्सा करण्यात आली होती. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन लोकप्रिय आर्षमहाकाव्यांचा संबंध होता. त्यामुळे 'हिंदूधर्मातील ती कोडी' म्हणजे फार संवेदनशील विषय बनला होता. या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेना व अन्य संघटनांनी केली होती. त्यानंतर या ग्रंथाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक मोर्चे-प्रतिमोर्चे, आंदोलने-प्रतिआंदोलने झाली होती. सामाजिक तणावही निर्माण झाला होता. मा.गो. वैद्यदुर्गाबाई भागवत यांनी ग्रंथावर बंदी घालण्याचे समर्थन केले. त्यावेळी ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत येथे झालेल्या रिडल्स समर्थन परिषद झाली, ज्यात दादासाहेब गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, राजा ढाले, नामदेव ढसाळ, रूपा कुळकर्णी-बोधी व अनेक रिपब्लिकन नेते आलेले होते.[]

त्यानंतर मात्र सर्व रिपब्लिकन नेते, बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांनी एकत्रित बसून "या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी सरकार सहमत असेलच असे नाही", अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे मध्ये रिडल्स इन हिंदुइझम हा चौथा खंड आहे.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. २९८. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ https://www.loksatta.com/mumbai-news/riddles-in-hinduism-in-marathi-1057448/
  3. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/turning-point/articleshow/34259857.cms
  4. ^ https://www.loksatta.com/mumbai-news/riddles-in-hinduism-in-marathi-1057448/