"समता (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६२: ओळ ६२:
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}


== हे ही पहा ==
==हे सुद्धा पहा==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[मूकनायक]]
* [[मूकनायक]]
* [[बहिष्कृत भारत]]
* [[बहिष्कृत भारत]]

२०:०८, ३१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

समता

समता
प्रकारदैनिक
आकारमान७४९ बाय ५९७ सेंटिमीटर

मुख्य संपादकदेवराव विष्णु नाइक
स्थापनाजून २९, १९२८
भाषामराठी
मुख्यालयभारत महाराष्ट्र, भारत
खप१००० हजार


समता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचे प्रकाशन २९ जून १९२८ रोजी झाले. हे वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांद्वारा समाज सुधार हेतू स्थापित संस्था समता संघाचे (समता सैनिक दलाचे) मुखपत्र होते. याचे संपादक म्हणून बाबासाहेबांनी देवराव विष्णू नाईक यांची नियुक्ती केली होती.

इतिहास

समता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले वृत्तपत्र आहे. समाज समता संघाचे समता हे पत्र 1928 झाली सुरू झाले पंजाबात भाई परमानंद जातपात तोडक मंडळातर्फे समतेची चळवळ चालवीत असत तशाच स्वरुपाचे कार्य व्हावे अशी आंबेडकरांची इच्छा होती. समाज समता संघाचा त्यासाठी उपयोग झाला ही. संघाच्या समता पाक्षिकाचे देवराव विष्णू नाईक हे संपादक होते ब्राह्मण-ब्राह्मणेतर नावाचे एक पत्र ते सन १९२५पर्यंत चालवीत असत. तो काळ ब्राह्मणेतर चळवळीचा होता व नाईक आपल्या पत्रातून वादाची वास्तव भूमिका निर्भीडपणे मांडीत असत ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीतील विचारांचा पगडा त्याच्या मनावर होता. बहिष्कृत भारत आंबेडकरांनी बंद केले, पण समता पत्र पुढे चालू राहिले या पत्राच्या लेखनाची व इतर सर्व जबाबदारी देवराव नाईक व कद्रेकर यांच्याकडे होती.[१]

१९२७ ते १९३४ या काळात आंबेडकरांनी अनेक कसोटीचे प्रसंग अनुभवले महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा, गोलमेज परिषद, महात्मा गांधींचे प्राणांतिक उपोषण, पुणे करार इत्यादी घटनांमुळे हा काळ धामधुमीचा ठरला या काळात समता व पुढे त्या पत्राचे नामांतर होऊन चालू राहिलेल्या जनता पत्राने मोलाची कामगिरी बजावली.[२]

हिंदुस्थानात व इंग्लंडमध्ये डॉक्टर आंबेडकर यांना आपल्या दलित बांधवांच्या वतीने विशेष महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागली. डॉक्टर साहेबांच्या गोलमेज परिषदेतील भाषणाची वाहवा झाली. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे आंबेडकर यांच्या भाषणाने एवढे प्रभावित झाले की त्यांनी आंबेडकरांना आर्थिक मदत देऊ केली. त्याचा फायदा वैयक्तिक लाभासाठी करून न घेता आंबेडकरांनी तिच्यातून जनता पत्रासाठी छपाईचे एक मोठे मशीन मिळविले.[३]

पहिला अंक

या वृत्तपत्राचे प्रकाशन २९ जून, इ.स. १९२८ रोजी झाले. वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांद्वारा समाज सुधार हेतू स्थापित संस्था ‘समता संघ’चे मुखपत्र होते. याचे संपादक म्हणून बाबासाहेबांनी देवराव विष्णू नाईक यांची नियुक्ती केली होती. 'जनता' पत्राकडे आंबेडकरांचे  इंग्लंड मधूनही लक्ष असे. या पत्राच्या खास अंकासाठी त्यांनी कद्रेकरांकडे एक खास संदेश इंग्रजीतून पाठविला होता. त्या संदेशाचा मथितार्थ कद्रेकरांनी स्वतःच सादर केला आहे तो असा "जनता पत्र सारखे वर्तमानपत्र विशेष आर्थिक मदत नसतानाही इतक्या उत्साहाने आपण चालवीत आहात हे पाहून आपले आभार कोणत्या शब्दात मानावे हेच कळत नाही. आपणास 'जनता' पत्राच्या खास अंकासाठी माझी भेट झाल्यावर माझा संदेशच नव्हे तर आर्थिक मदत व त्याहून अधिक काहीतरी देण्याचा व्यवस्था करेन.[४]

आंबेडकर लंडनला जाण्यापूर्वी मुंबईत यांना मानपत्र व थैली अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी उत्तर दाखल बोलताना त्यांनी जनता पत्राची घोषणा पुढील प्रमाणे केली की, "बहिष्कृत भारत हे आपल्या पाक्षिकाचे नाव असल्यामुळे ते पत्र बरेच लोक घेत नाहीत. आपले म्हणणे लोकांना कळावी हा उद्देश सफल होत नाही, म्हणून त्या पत्राचे नाव जनता असे ठेवले आहे व देवराव नाईक ह्यांच्या संपादकत्वाखाली ते सुरू होईल". त्याप्रमाणे जनता पाक्षिक 24 नोव्हेंबर १९३० मध्ये सुरू झाले. बंद पडलेल्या समता व बहिष्कृत भारतचे वर्गणीदार असलेल्यांना त्यांची वर्गणी संपेपर्यंत जनताचे अंक विनामूल्य पाठवण्यात येत असत.[५]

पहिले संपादक मंडळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झाली, कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली. जनता पत्राच्या पहिल्या अंकात संपादकांनी म्हटले होते की "समता व बहिष्कृत भारत ही दोन्ही पत्रे बंद पडल्यामुळे मागासलेल्या व पददलित जनतेच्या सुखदुःखांचा व भावनाचा आपलेपणाचा दृष्टीने विचार करणारे व जनतेचे विचार बोलून दाखवणारे दुसरे पत्र या भागात उरले नाही, यामुळे आपल्या विचारांची कुचंबणा होत असल्याची व आपल्या हेतूचा कळत-नकळत विपर्यास करण्यात येत असल्याची तीव्र जाणीव होऊ लागली आहे. ज्याला सत्तेने आपला म्हणता येईल आपले दुखणे निर्भीड व निर्भयपणे जगाच्या वेशीवर जे बांधू शकेल आणि त्रस्त झालेल्या जनतेला सहानुभूतीचे व धीराचे दोन शब्द सांगून कर्तव्यतत्पर करू शकेल; मतांच्या गलबल्यात जनतेला अचूक मार्गदर्शन करू शकेल, अशा प्रकारचे एक पत्र सतत सुरू असावे, असा समतेच्या व बहिष्कृत भारताच्या अनेक वाचकांना ध्यास लागलेला होता. त्यामुळे सध्याची परिस्थिती नवीन पत्र सुरू करायला अनुकूल असूनही हे जनता पत्र सुरू करण्याचे धाडस करावे लागत आहे.'[६]

डॉक्टर आंबेडकर स्वतःही मार्गदर्शन करण्यासाठी जनता पत्रात लेख लिहीत असत विशेषत: १९३५-३६ साली त्यांनी धर्मांतराची घोषणा केली त्यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना सामाजिक व धार्मिक प्रश्न कसाला लावण्याच्या दृष्टीने त्यांनी जनता पत्रात खास लेख लिहिले. १९३७ साली डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांनीच स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे निवडणूक लढविण्यात आली, त्यावेळी जनता पत्राने विशेष प्रभावी कार्य केले. पुढे भारताला स्वातंत्य मिळाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी केंद्रीय कायदे मंत्री म्हणून व राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीच्या अध्यक्ष म्हणून जी अपूर्व कामगिरी बजावली तिची माहिती जनता पत्राने जनतेपुढे ठेवली. १९ ऑक्टोबर १९३१ पासून जनता पत्र साप्ताहिक झाले व १९५६ पर्यंत चालू राहिले. देवराव नाईक यांच्यानंतर भारत कद्रेकर, गणेश सहस्रबुद्धे, बी.सी. कांबळे, यशवंत आंबेडकर इत्यादींनी संपादकाची सूत्रे सांभाळली. १९५६ साली डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर जनता पत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण झाले. पुढे दादा रूपवते, शंकरराव खरात यांनी संपादनाचा भार वाहिला मधू तांबेकर यांनीही प्रबुद्ध भारताला बरेच साहाय्य केले. [७]

समता वृत्तपत्राच्या आवृत्त्या

रचना

संदर्भ

  1. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ रविद्र चिंचोलकर, रविद्र. http://hdl.handle.net/10603/92035. 3 मे 2019 रोजी पाहिले. Cite journal requires |journal= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Kamble Rajeev S, Rajeev. http://shodhganga.inflibnet.ac.in http://hdl.handle.net/10603/104917. 3 मे 2019 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  5. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे