"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ४८: | ओळ ४८: | ||
== कलाकार == |
== कलाकार == |
||
मालिकेतील कलाकार व त्यांच्या व्यक्तिरेखा खालीलप्रमाणे आहेत. |
|||
* सागर देशमुख — [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] |
* सागर देशमुख — [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] |
||
* शिवानी रांगोळे — [[रमाबाई आंबेडकर]]<ref>https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-actress-going-to-play-a-role-of-ramabai-ambedkar-1896098/lite/</ref><ref>https://m.maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/shivani-rangole-to-play-ramabai-in-a-new-marathi-show-dr-babasaheb-ambedkar/amp_articleshow/69405933.cms</ref> |
* शिवानी रांगोळे — [[रमाबाई आंबेडकर]]<ref>https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-actress-going-to-play-a-role-of-ramabai-ambedkar-1896098/lite/</ref><ref>https://m.maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/shivani-rangole-to-play-ramabai-in-a-new-marathi-show-dr-babasaheb-ambedkar/amp_articleshow/69405933.cms</ref> |
||
⚫ | |||
* अमृत गायकवाड — बालक भीमराव/डॉ. बाबासाहेब आंबेडकर <ref>https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/child-artist-amrut-gaikwad-doing-role-of-babasaheb-ambedkar-in-serial-on-star-pravah-sd-375730.html</ref> |
* अमृत गायकवाड — बालक भीमराव/डॉ. बाबासाहेब आंबेडकर <ref>https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/child-artist-amrut-gaikwad-doing-role-of-babasaheb-ambedkar-in-serial-on-star-pravah-sd-375730.html</ref> |
||
⚫ | |||
* प्रथमेश दिवटे — आनंद, बाबासाहेबांचा थोरला भाऊ |
|||
== हे सुद्धा पहा == |
== हे सुद्धा पहा == |
२३:२६, २७ जून २०१९ ची आवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा | |
---|---|
दूरचित्रवाहिनी | स्टार प्रवाह |
भाषा | मराठी |
प्रकार | ऐतिहासिक |
देश | भारत |
निर्माता | नितीन वैद्य |
दिग्दर्शक | अजय मयेकर |
निर्मिती संस्था | दशमी क्रिएशन |
लेखक | पटकथाकार: अर्पणा पाडगावकर पटकथा लेखिका: शिल्पा कांबळे |
कलाकार | सागर देशमुख |
शीर्षकगीत/संगीत माहिती | |
शीर्षकगीत | क्रांतिसूर्य तू – शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका... ...भारताचा पाया माझा भीमराया |
शीर्षकगीत गायक | आदर्श शिंदे |
प्रसारण माहिती | |
पहिला भाग | १८ मे २०१९ |
निर्मिती माहिती | |
कार्यकारी निर्माता | अर्पणा पाडगावकर |
कालावधी | ३० मिनीटे |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ही १८ मे २०१९ पासून स्टार प्रवाह दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होत असणारी एक मराठी मालिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते.[१] या मालिकेची दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, दिग्दर्शन अजय मयेकर करणार आहेत. १८ मे २०१९ रोजी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला गेला आहे. मालिकेतून बाबासाहेबांचे बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण जीवनचरित्र रेखाटले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा मालिकेतून घेतला जाणार आहे.[२][३][४] या मालिकेत अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारत आहेत. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागरची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी मेकअप डिझाईन केले आहे.[५][६] क्रांतिसूर्य तू – शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका.... भारताचा पाया माझा भीमराया… असे या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द असून आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी केले आहे. गीताचे शब्द सुद्धा आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या दोघांनी लिहिले आहेत तर गायन आदर्शने केले आहे.[७][८]
आंबेडकरांवरील मालिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात मोठा वाटा असणारे स्टार प्रवाह वाहिनीचे कंटेंट हेड आणि सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे असे मत आहे की, "एक स्टोरी टेलर म्हणून मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, ज्या एका व्यक्तीच्या कृतज्ञतेपायी दादरच्या चैत्यभूमी, नागपूरच्या दीक्षाभूमी यांसारख्या ठिकाणी देशभरातून लाखो लोक येतात. आमच्या भाकरीवर, आमच्या जगण्यावर केवळ बाबासाहेबांचा अधिकार आहे, असे लोक म्हणतात, तेव्हा त्या व्यक्तीचे सामर्थ्य किती मोठे असेल विचार करा. आजही कुणा सामान्याला विचारले, तर संविधान लिहिणारा माणूस या पलीकडे कित्येकांना बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, त्यांचा त्याग आणि त्यांचे संपूर्ण देशासाठी असलेले कार्य, एवढे उत्तुंग आहे की, त्यांचा जीवनपट सर्वांपर्यंत पोहचवायलाच हवा, असा आमचा ध्यास आहे. त्याच ध्यासापायी, हे सर्व चालू आहे. बाबासाहेब सर्वांना कळावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे." तसेच दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी म्हणून अपर्णा पाडगावकर म्हणाल्या की, "बाबासाहेब म्हटले की केवळ आरक्षण देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हटले जाते, हे आपले अज्ञान आहे. गरोदर स्त्रीला तीन महिन्यांची अधिकृत सुटी, कामगारांना आठ तासांची शिफ्ट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा विविध स्त्री हक्काच्या, कामगार हक्काच्या निर्णयांत त्याचे मोठे योगदान होते, हे जोवर सर्वांपर्यंत पोहोचत नाही, तोवर परिस्थिती बदलणे अवघड आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असे मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न."[९]
कलाकार
मालिकेतील कलाकार व त्यांच्या व्यक्तिरेखा खालीलप्रमाणे आहेत.
- सागर देशमुख — डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- शिवानी रांगोळे — रमाबाई आंबेडकर[१०][११]
- अमृत गायकवाड — बालक भीमराव/डॉ. बाबासाहेब आंबेडकर [१२]
- अदिती विनायक द्रविड - तुळसा, बाबासाहेबांची बहिण
- प्रथमेश दिवटे — आनंद, बाबासाहेबांचा थोरला भाऊ
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ starpravahindia (2019-02-16), Bhimrao | भीमराव - एक गौरव गाथा | New Serial Promo | Starts 14th April | Star Pravah, 2019-02-19 रोजी पाहिले
- ^ author/online-lokmat. Lokmat http://www.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-life-journey-will-be-shown-small-screen/. 2019-02-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/new-marathi-tv-serial-on-dr-b-r-ambedkars-life-to-start-on-star-pravah/articleshow/68044422.cms. 2019-02-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ The Times of India (इंग्रजी भाषेत) https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/a-new-show-based-on-the-life-of-babasaheb-bhimrao-ambedkar-to-go-on-air-soon/articleshow/68023249.cms. 2019-02-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms. 2019-04-02 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ टीम, एबीपी माझा वेब. ABP Majha https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968. 2019-03-28 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Loksatta https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/. 2019-05-09 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ टीम, एबीपी माझा वेब. ABP Majha https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560. 2019-05-09 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ divyamarathi https://divyamarathi.bhaskar.com/news/maheshkumar-munjale-writes-about-ambedkar-jayanti-6046511.html. 2019-05-09 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-actress-going-to-play-a-role-of-ramabai-ambedkar-1896098/lite/
- ^ https://m.maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/shivani-rangole-to-play-ramabai-in-a-new-marathi-show-dr-babasaheb-ambedkar/amp_articleshow/69405933.cms
- ^ https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/child-artist-amrut-gaikwad-doing-role-of-babasaheb-ambedkar-in-serial-on-star-pravah-sd-375730.html