आदर्श शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आदर्श शिंदे
Adarsh Shinde in Jafrabad.jpg
जाफ्राबादमधील 'आदर्श शिंदे नाईट्स' या भीमगीतांच्या कार्यक्रमात आदर्श शिंदे, १० एप्रिल २०१८.
आयुष्य
जन्म ७ मार्च १९८८
जन्म स्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म बौद्ध
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई विजया शिंदे
वडील आनंद शिंदे
जोडीदार नेहा लेले-शिंदे
अपत्ये अंतरा शिंदे
संगीत साधना
गुरू सुरेश वाडकर
गायन प्रकार लोक गायन, भीमगीत व इतर
घराणे शिंदे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

आदर्श आनंद शिंदे (जन्म : ७ मार्च, इ.स. १९८८) हे एक मराठी गायक आहेत. हे भीमगीतांसाठी प्रसिद्ध असून त्यांनी अनेक लोक गीते व चित्रपट गीतेही गायली आहेत.

वैयक्तिक जीवन[संपादन]

आदर्श शिंदे हे एका समृद्ध गायनपरंपरा असलेल्या कुटुंबातून आले आहेत. पार्श्वगायक आनंद शिंदे हे त्यांचे वडील, मिलिंद शिंदे हे काका आणि गायक प्रल्हाद शिंदे हे त्यांचे आजोबा होत.

आदर्श शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणे शिकायला सुरुवात केली. त्यांनी सुरेश वाडकर यांच्याकडून शास्त्रीय संगीतातील धडे घेतले आहे.

आदर्श शिंदेंनी 27 मे 2015रोजी नेहा लेले सोबत मुंबईत बौद्ध पद्धतीने विवाह केला.[१]

कारकीर्द[संपादन]

आदर्श शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या आणि काका मिलिंद शिंदे यांच्यासोबत अल्बममध्ये गायन करून करिअरची सुरुवात केली. ‘स्टार प्रवाह’ या दूरचित्रवाणीवरील ‘आता होऊन जाऊ द्या’ या रियालिटी शोमध्ये भाग घेतल्याने लोक त्यांना ओळखू लागले.

सन २०१४ मध्ये "शिंदे" कुटुंबाने प्रियतमा या चित्रपटासाठी एकत्र गायन केले. तीन पिढ्यांचे एकत्र पार्श्वगायन ही मराठी चित्रपट उद्योगात घडलेली पहिलीच घटना होती.

आदर्श शिंदे यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये १५०० हून अधिक गाणी गायली आहेत.[२]

पुरस्कार[संपादन]

आदर्श शिंदे यांना मिळालेले पुरस्कार

  • दादासाहेब फाळके पुरस्कारदुनियादारी या चित्रपटातील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ या गाण्यासाठी
  • मराठी मिर्ची संगीत पुरस्कार - ‘रेडियो मिर्ची’कडून
  • गायक ऑफ द ईयर पुरस्कार – ‘स्टार प्रवाह’कडून

संदर्भ[संपादन]

[३]

[४]

  1. ^ https://m.bhaskar.com/maharashtra/pune/news/MH-PUN-HMU-wedding-pics-of-well-known-singer-adarsh-shinde-5007221-PHO.html
  2. ^ https://www.marathi.tv/singers-gayak/adarsh-shinde-bio/
  3. ^ http://adarshशिंदे.com/about.html
  4. ^ http://www.marathi.tv/singers-gayak/adarsh-शिंदे-bio/