"वेरूळ लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१: ओळ ३१:
हा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टिपथात राहिला. राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेल्या भेटीची नोंद सापडते. दहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने येथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिस्टा, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://asi.nic.in/asi_monu_whs_ellora.asp|title=Ellora Caves, Maharashtra - Archaeological Survey of India|website=asi.nic.in|access-date=2018-03-31}}</ref>

==रचना==
[[File:027 Cave 11, Buddha from Side (33996998582).jpg|thumb|लेणे क्र. ११ मधील बुद्ध शिल्प]]
[[File:2 Mahavira dans la grotte Jain Indra Sabha Ellora cave India.jpg|thumb|[[महावीर]] यांचे शिल्प]]
[[File:Ellora cave29 Shiva-Parvati-Ravana.jpg|thumb|लेणे क्र. २९ शिव पार्वती - रावण शिल्प]]
भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य [[हत्ती]], त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. [[पुराणे|पुराणातील]] शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत.

दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यांत खिडक्या आहेत. या ठिकाणी [[चैत्य]] [[विहार]] आणि [[स्तूप]] असून स्तूपात बैठी [[बुद्ध]]मूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. [[घारापुरी]] येथील [[एलिफंटा लेणी|एलिफंटा लेण्यातील]] शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा [[जैन]] धर्मीयांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.
==आंतरराष्ट्रीय स्मारक==
==आंतरराष्ट्रीय स्मारक==
[[File:Ellora Caves - Carvings.JPG|thumb|बुद्ध मुर्ती]]
[[File:Ellora Caves - Carvings.JPG|thumb|बुद्ध मुर्ती]]
[[File:Ellora Kailash temple overview.jpg|thumb|शिल्पांकित स्तंभ]]
[[File:Ellora Kailash temple overview.jpg|thumb|शिल्पांकित स्तंभ]]
१९व्या शतकात भारतात ब्रिटिशांची राजवट असताना वेरुळ दुर्लक्षित होते. मूर्तींचेही घुसखोरांमुळे किंवा काळाच्या ओघात नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडफार प्रयत्न केले. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६०च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा-वेरूळचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.

==कैलास लेणे==
==कैलास लेणे==

१६:१७, ३१ मार्च २०१८ ची आवृत्ती

वेरूळची लेणी
कैलाशनाथ मंदिराच्या गुहेत खडकाच्या सर्वात वरून पाहिलेले दृश्य
स्थान औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र, भारत
प्रकार सांस्कृतिक
कारण i, iii, vi
सूचीकरण १९८३ साली घोषित (7th session)
नोंदणी क्रमांक क्र. २४३
युनेस्को क्षेत्र आशिया-पॅसिफिक
वेरूळची लेणी
कैलास मंदिर
लेणे क्र. १० स्तूपातील बुद्धमूर्ती

वेरूळची लेणी (Ellora Caves) ही औरंगाबाद शहरापासून ३० कि. मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील वेरूळ परिसरात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात डोंगरकड्यात कोरलेली १७ हिंदू, १२ बौद्ध आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. इ.स. १९५१ साली भारत सरकारने ही वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने १९८३ मध्ये वेरूळ लेण्यांचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला.[१][२]

इतिहास

पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेण्यांतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम) याच्या काळात झालेली आहे.[३] या लेण्यापैकी १५ क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे.इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे. कैलास लेणे निर्माण करणारा राजा कृष्ण (पहिला)हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असे यावरून समजते.[४]

हा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टिपथात राहिला. राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेल्या भेटीची नोंद सापडते. दहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने येथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिस्टा, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होती.[५]

रचना

लेणे क्र. ११ मधील बुद्ध शिल्प
महावीर यांचे शिल्प
लेणे क्र. २९ शिव पार्वती - रावण शिल्प

भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत.

दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यांत खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा जैन धर्मीयांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.

आंतरराष्ट्रीय स्मारक

बुद्ध मुर्ती
शिल्पांकित स्तंभ

१९व्या शतकात भारतात ब्रिटिशांची राजवट असताना वेरुळ दुर्लक्षित होते. मूर्तींचेही घुसखोरांमुळे किंवा काळाच्या ओघात नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडफार प्रयत्न केले. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६०च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा-वेरूळचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.

कैलास लेणे

या लेणींमधील कैलास लेणे हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय. `आधी कळस, मग पाया' ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे.

मध्ययुगातील एक आश्चर्य असे कैलास या लेण्याच्या निर्मितीविषयी नोंदविले आहे. याच्या निर्मितीची आख्यायिका प्रसिद्ध आहे. कथा कल्पतरू या ग्रंथात आलेल्या या कथेप्रमाणे राजा कृष्ण याज्ञवल्क्य हा आजारी झाला. त्याचा राणीने घृष्णेश्वर येथील शिवाला नवस केला. तिने पतीला उतार पडल्यास मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि ते बांधून पूर्ण होईपर्यंत उपवास करायचे ठरविले. परंतु एका पाषाणातील हे मंदिर पूर्ण होण्यास काही काल द्यावा लागेल असे वास्तुशिल्पी समूहाने सांगितले. तथापि कोकस नावाच्या वास्तू विशारदाने एका आठवड्यात या मंदिराचे शिखर घडविले. त्याने पाषाण वरून खाली या पद्धतीने कोरून काढून मंदिराची बांधणी सुरू केली. या मंदिराला राणीने माणिकेश्वर असे नाव दिले.[६]

जैन लेणी समूह

जैन धर्मीयांची क्र. ३० ते ३४ अशी एकूण पाच गुहा-मंदिरे येथे आहेत. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. तत्कालीन बौद्ध-हिंदू लेणी शिल्पकलेचा या जैन लेण्यांवर प्रभाव जाणवतो. या लेण्यांतील छोटा कैलास शिल्पाकृती म्हणजे हिंदू कैलासाची छोटी प्रतिकृती असावी असे वाटते. ही लेणी एक मजलीच असून तती आतून एकमेकांना जोडली आहेत. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे अशी शिल्पकला येथे पहायला मिळते. २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. याशिवाय इंद्र, गोमटेश्वर यांची शिल्पेही येथे पाहावयास मिळतात.[७]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "स्थापत्यकलेतील आश्चर्य". Loksatta. 2017-10-20. 2018-03-31 रोजी पाहिले.
  2. ^ Centre, UNESCO World Heritage. "Ellora Caves". whc.unesco.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-31 रोजी पाहिले.
  3. ^ "एलोरा की गुफ़ाएं - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर". bharatdiscovery.org (हिंदी भाषेत). 2018-03-31 रोजी पाहिले.
  4. ^ "Ellora Caves, Maharashtra - Archaeological Survey of India". asi.nic.in. 2018-03-31 रोजी पाहिले.
  5. ^ "Ellora Caves, Maharashtra - Archaeological Survey of India". asi.nic.in. 2018-03-31 रोजी पाहिले.
  6. ^ M. K. Dhavalikar 1982, p. 42-43.
  7. ^ "वेरुळ लेणी : भूलोकीचा स्वर्ग". Loksatta. 2014-06-28. 2018-03-31 रोजी पाहिले.

बाह्य दुवे