राग बागेश्री
Appearance
(बागेश्री या पानावरून पुनर्निर्देशित)
राग बागेश्री हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
- थाट
हा काफी थाटाचा राग आहे.
- स्वर
या रागात गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल आहेत. या रागात पंचम (प) वर्ज्य आहे.
- आरोह
ऩि॒ सा ग॒ म, ध नि॒ सां
- अवरोह
सां नि॒ ध, म ग॒ रे सा
- वादी आणि संवादी
या रागाचा वादी स्वर मध्यम (म) असून संवादी स्वर षड्ज (सा) आहे.
- पकड
धनी सा,म धनी ध ग॒ म म प, ध,ग म रे सा।
- जवळचे राग
संदर्भ
[संपादन]१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर.
बागेश्री रागातील गाणी
[संपादन]बागेश्री रागात अनेक मराठी भावगीते आहेत. उदा०
- कंठातच रुतल्या ताना (कवी - गंगाधर महाम्बरे]], गायिका - आशा भोसले; संगीत - श्रीनिवास खळे)
- केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर (कवी - अशोकजी परांजपे, गायिका - सुमन कल्याणपूर, संगीत - अशोक पत्की), वगैरे.
बागेश्री रागातील हिंदी गीते
[संपादन]- आजा रे परदेसी (चित्रपट - मधुमती)
- घडी घडी मोरा दिल धडके (मधुमती)
- चाह बरबाद करेगी (शहाजहान)
- दीवाने तुम दीवाने हम (बेज़ुबान)
- बेदर्दी दगाबाज़ जा तू नहीं बलमा मोरा (ब्लफमास्टर)
- हमसे आया न गया (देख कबीरा रोया), वगैरे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |