Jump to content

कार्तिक पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कार्तिक पौर्णिमा (बौद्ध सण) या पानावरून पुनर्निर्देशित)
कार्तिक पौर्णिमेच्या वेळी वाराणसी येथे देव दीपावली

कार्तिक पौर्णिमा हा एक बौद्धांचा व हिंदूंचा सण आहे.

बौद्ध धर्म

[संपादन]

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रज्ञचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.

हिंदू धर्म

[संपादन]

कार्तिक महिन्याच्या या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणले जाते. या रात्री कार्तिकेयाने त्रिपुरासुराचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यानिमित्त या दिवशी कार्तिकेयाचे पूजन केले जाते. केवळ या रात्रीच महिला कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात, असाही संकेत रूढ आहे. या दिवशी मंदिरांमध्ये दीपोत्सव केला जातो.

कार्तिक पौर्णिमा ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


हे ही पहा

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]