Jump to content

अरविंद केजरीवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरविंद गोविंद राम केजरीवाल या पानावरून पुनर्निर्देशित)
अरविंद केजरीवाल

कार्यकाळ
२६ डिसेंबर २०१३ – १४ फेब्रुवारी २०१४
मागील शीला दीक्षित
पुढील राष्ट्रपती राजवट
कार्यकाळ
१४ फेब्रुवारी २०१५ – १७ सप्टेंबर २०२४
मागील शीला दीक्षित
मतदारसंघ नवी दिल्ली

जन्म १६ ऑगस्ट, १९६८ (1968-08-16) (वय: ५६)
हिस्सार, हरियाणा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष आम आदमी पार्टी
आई गीतादेवी
वडील गोविंद राम केजरीवाल
पत्नी सु्नीता केजरीवाल
अपत्ये २ (हर्षिता आणि पुलकित)
गुरुकुल आय.आय.टी. खरगपूर
व्यवसाय राजकारण

अरविंद गोविंद राम केजरीवाल (जन्म : हिस्सार, हरियाणा, १६ ऑगस्ट १९६८ ) हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, आम आदमी पार्टीचे संस्थापक व पक्षाध्यक्ष व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत.

त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथून अभियांत्रिकी शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये नोकरी केली. ह्या नोकरीमध्ये असताना त्यांनी टाटा स्टीलमधील सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी बदली मागितली परंतु त्यांची अभियांत्रिकी पदवी असल्याकारणाने त्यांना सदर विभागामध्ये बदली नाकारण्यात आली. म्हणून त्यांनी टाटा स्टीलची नोकरी १९९२ मध्ये सोडली आणि ते कोलकाता येथील मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी, ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशन आणि नेहरू युवा केंद्र येथे काम करू लागले.[] त्यानंतर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयकर विभागामध्ये सहआयुक्त या पदावर काम केले.[ संदर्भ हवा ]

माहिती अधिकाराचा कायदा व जनलोकपाल संमत व्हावा यासाठी त्यांनी अण्णा हजारे सोबत काम केले.[ संदर्भ हवा ] इ.स. २००६ साली लक्षवेधी नेतृत्वासाठी त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रेमन मॅगसेसे पुरस्काराचा निधी दान करून, अरविंद केजरीवाल यांनी पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थेची इ.स. २०१२मध्ये स्थापना केली.[ संदर्भ हवा ]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

अरविंद केजरीवाल यांचे वडील गोविंदराम हे मेसराच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता होते. आईचे नाव गीतादेवी. केजरीवाल बालपणी हिस्सार, सोनेपत, मथुरा यासारख्या उत्तरी भारतातील गावांत राहिले. त्यांचे शालेय शिक्षण कॅंपस हायस्कूल, हिस्सार येथे झाले.[] इ.स. १९८९ साली त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. तेथील नेहरू हॉलमध्ये ते राहत होते. महाविद्यालयीन जीवनामध्येही सुटीच्या वेळी झोपडपट्टीतील मुलांना शिकविण्यासाठी जात असत. झोपडपट्टीतील जीवन काय असते हे पूर्णतः समजून घेण्यासाठी ते तीन महिने स्वेच्छेने स्वतः झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास होते.[]साचा:मृतदुवा[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

[संपादन]

१९९२ मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यावर ते भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) नोकरीला लागले..[]. फेब्रुवारी २००६ मध्ये त्यांनी आयकर विभागाच्या जॉइंट कमिशनर पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली.[]

त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे परिवर्तन नावाच्या नागरिकांची चळवळ चालवणाऱ्या संस्थेची स्थापना केली. डिसेंबर २००६ मध्ये त्यांनी मनीष सिसोदिया आणि अभिनंदन सेखरी यांच्या बरोबर पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन सुरू केले. त्यातून स्थानिक राज्यकारभार आणि माहितीच्या आधिकारासंबंधीच्या मोहिमा चालवल्या जातात.[] त्यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर यांच्यातर्फे देण्यात येणारा सत्येंद्रनाथ दुबे पुरस्कार मिळाला आहे.[][] त्यांनी २९ जुलै २०१२ या दिवशी स्वराज नावाचे पुस्तक जंतरमंतर, नवी दिल्ली येथे प्रसिद्ध केले. या पुस्तकाचे ’स्वराज्य’ नावाचे मराठी भाषांतर श्रीनिवास जोशी यांनी केले आहे.[ संदर्भ हवा ]

२०१३ सालची दिल्ली विधानसभा निवडणूक

[संपादन]

डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीने ७० पैकी ६९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ह्यांपैकी २८ जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षाखालोखाल आम आदमी पक्षाने दुसरा क्रमांक पटकावला. पक्षाध्यक्ष केजरीवाल ह्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांचा २५,८६४ मतांनी पराभव केला.[ संदर्भ हवा ]

२०१५ सालची दिल्ली विधानसभा निवडणूक

[संपादन]

२०१५ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकूण ७० पैकी ६७ जागा जिंकून विधानसभेत बहुमत मिळवले. भारतीय जनता पक्षाला फक्त ३ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला शून्य.[ संदर्भ हवा ]

सन्मान आणि पुरस्कार[ संदर्भ हवा ]

[संपादन]
  • अशोका फेलो (२००४)
  • असोसिएशन फॉर इंडियाज डेव्हलपमेन्टतर्फे फेलोशिप आणि निधी (२००९)
  • इकॉनॉमिक टाइम्सतर्फे ’कॉर्पोरेट एक्सलन्स’ पारितोषिक (२०१०)
  • ’एन.डी.टी.व्ही.तर्फे अण्णा हजारे यांच्या सोबत इंडियन ऑफ द इयर’ पारितोषिक (२०११)
  • कानपूरच्या आय‍आयटीतर्फे सत्येंद्र दुबे पारितोषिक (२००५)
  • खरगपूरच्या आय‍आयटीतर्फे सर्वोत्कृष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार (२००९)
  • रेमन मॅगसेसे पारितोषिक (२००६)
  • सीएनएन-आयबीएनतर्फे ’इंडियन ऑफ इयर’ पारितोषिक (२००६)

अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेली आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके[ संदर्भ हवा ]

[संपादन]
  • Arvind Kejriwal a Man of Action (इंग्रजी, लेखक एम.के. सिंग)
  • Arvind Kejriwal & the Aam Aadmi Party : An Inside Look (इंग्रजी, लेखक - प्राण कुरूप)
  • अरविंद केजरीवाल आम आणि खास (रमेश दिघे)
  • Arvind Kejriwal : Dare to Fight (इंग्रजी, लेखक - एन.के बन्सल, सौरभ शर्मा)
  • अरविंद केजरीवाल : भारत नये क्षितिज की ओर (हिंदी, प्रतिभा सहानी पुरूवा)
  • आम जनता आप नेता अरविंद केजरीवाल (स्वाती महाळंक)
  • केजरीवाल व्यवस्था परिवर्तन की आराधना (हिंदी,विजयपाल चौरासिया)
  • Good Luck Chief Minister : Bittersweet Poems on Arvind Kejriwal (मनू कांत)
  • My Name is Kejriwal, Arvind Kejriwal (Poems on Arvind Kejriwal) (मनू कांत)
  • स्वराज्य (मूळ इंग्रजी Swaraj, लेखक अरविंद केजरीवाल, मराठी अनुवाद श्रीनिवास जोशी)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Sivanand, Mohan. "Arvind Kejriwal's Quest for Change". Rreaders Digest. 2012-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 August 2011 रोजी पाहिले.
  2. ^ मॅगसेसे पुरस्कारच्या संकेतस्थळावरील केजरीवाल यांची माहिती Archived 2011-11-10 at the Wayback Machine.. rmaf.org.ph
  3. ^ "भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर यांचे नामांकित माजी विद्यार्थी". 22 August 2011 रोजी पाहिले.
  4. ^ Press Trust of India (2011-12-21), "Federal Government accepts Kejriwal's resignation after six years in 2011", CNN-IBN, 2012-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित, 2011-12-21 रोजी पाहिले
  5. ^ "Public Cause Research Foundation". 2011-07-21 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 August 2011 रोजी पाहिले.
  6. ^ चरित्र भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर यांचा सत्येंद्र दुबे स्मृती पुरस्कार
  7. ^ Hauzel, Hoihnu (30 September 2006). "Fighting the odds -टेलिग्राफ पत्रातील लेख". The Telegraph. 20 August 2011 रोजी पाहिले.