Jump to content

आदर्श शास्त्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आदर्श शास्त्री

आदर्श शास्त्री (जन्म १६ ऑक्टोबर १९७३) हे दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संसदीय सचिव आहेत. ते आम आदमी पार्टीचे आमदार असुन दिल्लीच्या द्वारका विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते शैक्षणिक व सामाजिक सामाजिक कार्यकर्ते आहेत. विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांत १७ वर्षे नोकरी केल्यानंतर आदर्श हे ऍपल कंपनीचे भारतातील विक्री प्रमुख होते. वर्षिक १ कोटीहून अधिक वेतन घेत सताना ती नोकरी सोडून ते आम आदमी पार्टीच्या राजकारण बदलण्याच्या मोहिमेत सामिल झाले. भारताचे दुसरे पंतप्रधान, दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे ते नातू आहेत.

आदर्श शास्त्री हे अनिल शास्त्री आणि मंजू शास्त्री यांचे चिरंजीव आहेत. त्यांचा मोनिका शास्त्री यांच्याशी विवाह झाला आहे. या जोडप्याला अभिनव आणि अभिजीत अशी दोन मुले आहेत. त्यांचे वडील अनिल शास्त्री हे भारतचे माजी अर्थमंत्री आहेत आणि १९८९ मध्ये वाराणसी येथून ९ व्या लोकसभेवर निवडून गेले होते. आदर्श यांचे शिक्षण सेंट कोलंबिया स्कूल, दिल्ली आणि हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठात झाले. त्यांनी लाल बहादूर शास्त्री इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, दिल्ली येथून व्यवसाय प्रशासनावर पदव्युत्तर आभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांचे वडील हे लाल बहादूर शास्त्रींचे दुसरे पुत्र आहेत.

सध्या आदर्श शास्त्री आम आदमी पक्षाच्या परदेशी विभागाचे सह-संयोजक आहेत. आम आदमी पक्षाच्या संघटनेला तळागाळातून उभारणीसाठी त्यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. त्यांनी दिल्लीच्या द्वारका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांना १,३५,००० मतांपैकी ७९, ७२९ मिळाली. विधानसभेतील त्या वेळेचे विद्यमान आमदार संजय राजपूत यांना त्यांनी ३९,३६६ मतांच्या फरकाने पराभूत केले.

आदर्श शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली संवाद नावाचा मंच कार्यरत आहे. दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवायच्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वास्तविक आणि व्यावहारिक योजना तयार करण्यावर येथे संवाद येथे चालतो. आशिष खेतान, मीरा सान्याल, प्रीती शर्मा हे या मंचाचे इतर काही सदस्य आहेत. दिल्लीच्या नागरिकांकरीता मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देणे आणि स्मार्ट प्रशासनाच्या माध्यमाने सरकारला वेबवर आणणे हे दिल्ली संवादाचेच भाग आहेत.

'दिल्ली संवाद' या संकल्पनेचा विस्तार करीत आम आदमी पार्टीच्या सरकारने दिल्ली डायलॉग कमिशनचे गठन केले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या दिल्लीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ सदस्यीय समितीच्या स्थापन झाली आली. पारदर्शी प्रशासनासाठी ७० कलमी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचाच वायफाय प्रकल्प आणि विविध इ-गव्हर्नन्स उपक्रम आहेत.

आदर्श शास्त्रींना हे निष्ठावान मार्गांनी आपल्या सहकार्यांशी कायमस्वरूपी नातेसंबंध निर्माण करण्यासठी ओळखलले जातात. आपल्या व्यावसायिक जीवनात व्होडाफोनचे विक्री मॅनेजर, सॅमसन्स मधे जनरल मॅनेजर ते ऍपल कंपनीचे भारतातील विक्री प्रमुख पदे त्यांनी हाताळली आहेत.