पिनाराई विजयन
Jump to navigation
Jump to search
पिनाराई विजयन | |
| |
विद्यमान | |
पदग्रहण २० मे २०१६ | |
मागील | ओम्मेन चंडी |
---|---|
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोचे सदस्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण २४ मार्च २००२ | |
केरळ राज्य विद्युतमंत्री
| |
कार्यकाळ १९९६ – १९९८ | |
जन्म | २१ मार्च, १९४४ पिनाराई, कण्णुर जिल्हा, मद्रास प्रांत (आजचा केरळ) |
राजकीय पक्ष | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष |
पिनाराई विजयन (मल्याळम: പിണറായി വിജയൻ; जन्म: २१ मार्च १९४४) हे एक भारतीय राजकारणी व केरळ राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २०१६ सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. आघाडीच्या विधीमंडळाचे नेते असलेल्या विजयन ह्यांनी २० मे २०१६ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
केरळच्या राजकारणात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले विजयन १९९८ ते २०१५ दरम्यान कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ शाखेचे सरचिटणीस होते. त्यांनी १९९६ ते १९९८ दरम्यान राज्य सरकरमध्ये मंत्रीपद देखील भुषवले आहे.