सुधीर सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रिगेडियर सुधीर सावंत हे माजी खासदार व आम आदमी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत सिंदखेड राजा येथे आम आदमी पक्षात प्रवेश केला. ते राजापूर या लोकसभा मतदार संघातुन ते खासदार म्हणून निवडून आले होते.

बालपण आणि शिक्षण[संपादन]

सुधीर सावंत यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील मानगुट्टी गावात ९ फेब्रुवारी १९५५ रोजी झाला. त्यांचे वडील सीताराम सखाराम सावंत स्वातंत्रलढ्यात क्रांतिकारकांच्या जहाल गटात होते. स्वातंत्र्योत्तर काळात ते शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रिय झाले. १९५७ ते १९७२ या काळात सी. स. सावंत हे आमदार राहिले. जन्मापासूनच सुधीर सावंतांवर सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता.[१]

कारकीर्द[संपादन]

राजकीय कारकीर्द[संपादन]

सेनादलातून निवृत्त झाल्यानंतर १९९१ला राजीव गांधींनी सुधीर सावंतांना राजकारणात आणले. कोकणातील राजापूर मतदारसंघातून (जो मतदारसंघ १९५२ नंतर काँग्रेसने कधीही जिंकला नव्हता) खासदार म्हणून ते निवडून आले. २००४ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सोनिया गांधींनी देखील मनमोहन सिंगांद्वारे देशाला विकण्याचा भाजपचा कार्यक्रम पुढे चालू ठेवल्याने यांनी आमदारकीचा व काँग्रेसचा राजीनामा दिला. शिवराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. हा पक्ष "भारतीय राज्य घटनेचे पूर्णपणे तंतोतंत पालन करण्यासाठी" स्थापन झाला आहे, असे सांगितले जाते.


शिवराज्य पक्षाची पुनर्बांधणी करून शिवरायांचे आदर्श लोककल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. "थर्ड आय -(Third Eye)" या लेखमालेच्या माध्यमातून सावंतांनी राजकीय साहित्य निर्माण केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-04. 2014-10-05 रोजी पाहिले.