तेलंगणाचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के. चंद्रशेखर राव हे तेलंगणाराज्याचे पहिले व विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

तेलंगणाचा मुख्यमंत्री हा भारताच्या तेलंगणा राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

२०१४ साली आंध्र प्रदेश राज्यामधून तेलंगणा राज्य वेगळे करण्यात आले. २ जून २०१४ रोजी के. चंद्रशेखर राव हे राज्याचे पहिले व विद्यमान मुख्यमंत्री बनले.

यादी[संपादन]

क्रम नाव पदावरील काळ कार्यकाळ पक्ष
1 के. चंद्रशेखर राव २ जून २०१४ विद्यमान 3295 दिवस भारत राष्ट्र समिती

संदर्भ[संपादन]