मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री हा भारताच्या मध्य प्रदेश राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

१ नोव्हेंबर १९५६ रोजच्या मध्य प्रदेश राज्याच्या निर्मितीपासून आजवर १८ नेते मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत.

यादी[संपादन]

पक्षांचे रंगसंकेत
क्रमांक नाव कार्यकाल पक्ष कार्यकाळाचे दिवस
1 रविशंकर शुक्ला 1 नोव्हेंबर 1956 31 डिसेंबर 1956 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 61 दिवस
2 भगवंतराव मंडलोई 1 जानेवारी 1957 30 जानेवारी 1957 30 दिवस
3 कैलाशनाथ काटजू 31 जानेवारी 1957 14 मार्च 1957 43 दिवस
14 मार्च 1957 11 मार्च 1962 1823 दिवस [एकूण 1866 दिवस]
4 भगवंतराव मंडलोई 12 मार्च 1962 29 सप्टेंबर 1963 567 दिवस
5 द्वारका प्रसाद मिश्रा 30 सप्टेंबर 1963 8 मार्च 1967 1256 दिवस
9 मार्च 1967 29 जुलै 1967 143 दिवस [एकूण 1399 दिवस]
6 गोविंद नारायण सिंह 30 जुलै 1967 12 मार्च 1969 संयुक्त विधायक दल 592 दिवस
7 नरेशचंद्र सिंह 13 मार्च 1969 25 मार्च 1969 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 13 दिवस
8 श्यामा चरण शुक्ला 26 मार्च 1969 28 जानेवारी 1972 1038 दिवस
9 प्रकाश चंद्र सेठी 29 जानेवारी 1972 22 मार्च 1972 54 दिवस
23 मार्च 1972 22 डिसेंबर 1975 1004 दिवस [एकूण 1058 दिवस]
(8) श्यामा चरण शुक्ला [2] 23 डिसेंबर 1975 29 एप्रिल 1977 494 दिवस
रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
29 एप्रिल 1977 25 जून 1977 N/A
10 कैलाश चंद्र जोशी 26 जून 1977 17 जानेवारी 1978 जनता पक्ष 206 दिवस
11 वीरेंद्र कुमार सखलेचा 18 जानेवारी 1978 19 जानेवारी 1980 732 दिवस
12 सुंदरलाल पटवा 20 जानेवारी 1980 17 फेब्रुवारी 1980 29 दिवस
रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
18 फेब्रुवारी 1980 8 जून 1980 N/A
13 अर्जुन सिंग 8 जून 1980 10 मार्च 1985 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1736 दिवस
11 मार्च 1985 12 मार्च 1985 2 दिवस
14 मोतीलाल व्होरा 13 मार्च 1985 13 फेब्रुवारी 1988 1068 दिवस
(13) अर्जुन सिंग [2] 14 फेब्रुवारी 1988 24 जानेवारी 1989 345 दिवस [एकूण 2083 दिवस]
(14) मोतीलाल व्होरा 25 जानेवारी 1989 8 डिसेंबर 1989 318 दिवस [एकूण 1386 दिवस]
(8) श्यामा चरण शुक्ला [3] 9 डिसेंबर 1989 4 मार्च 1990 86 दिवस [एकूण 1618 दिवस]
(12) सुंदरलाल पटवा [2] 5 मार्च 1990 15 डिसेंबर 1992 भारतीय जनता पक्ष 1017 दिवस [एकूण 1046 दिवस]
रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
16 डिसेंबर 1992 6 डिसेंबर 1993 N/A
15 दिग्विजय सिंग 7 डिसेंबर 1993 1 डिसेंबर 1998 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1820 दिवस
1 डिसेंबर 1998 8 डिसेंबर 2003 1834 दिवस [एकूण 3654 दिवस]
16 उमा भारती 8 डिसेंबर 2003 23 ऑगस्ट 2004 भारतीय जनता पक्ष 260 दिवस
17 बाबुलाल गौर 23 ऑगस्ट 2004 29 नोव्हेंबर 2005 464 दिवस
18 शिवराजसिंह चौहान 29 नोव्हेंबर 2005 12 डिसेंबर 2008 6508 दिवस
12 डिसेंबर 2008 12 डिसेंबर 2013
13 डिसेंबर 2013 16 डिसेंबर 2018
19 कमल नाथ 17 डिसेंंबर 2018 पदासीन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ अंबरीष दिवाणजी. "राष्ट्रपती राजवटीवरील माहिती". Rediff.com. 15 मार्च 2005.चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.