योगी आदित्यनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
योगी आदित्यनाथ

विद्यमान
पदग्रहण
19 मार्च 2017
राज्यपाल राम नाईक
मागील अखिलेश यादव

लोकसभा सदस्य
गोरखपूर साठी
विद्यमान
पदग्रहण
१९९८
मागील महंत अवैद्यनाथ

जन्म ५ जून, १९७२ (1972-06-05) (वय: ५१)
पंचूड, पौडी गढवाल, उत्तराखंड
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी अविवाहित

महंत योगी आदित्यनाथ (जन्मनाम: अजय सिंह बिष्ट, ५ जून १९७२) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.

२०१७ विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आदित्यनाथ जहाल हिंदूवादी मानले जातात व त्यांच्यावर अनेकदा प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोप झाला आहे. परंतु मुख्यमंत्री बनल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण कोणताही भेदभाव न करता राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे जाहीर केले.

बाह्य दुवे[संपादन]