Jump to content

त्रिपुराचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माणिक सरकार हे १९९८ ते २०१८ दरम्यान त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदावर होते.

त्रिपुराचा मुख्यमंत्री हा भारताच्या त्रिपुरा राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

गेल्या अनेक दशकांपासून त्रिपुराच्या राजकारणावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. १९९८ ते २०१८ दरम्यान सलग ५ वेळा माकपचे माणिक सरकार राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर निवडून आले. पर्ंतु २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रथमच राज्यात मुसंडी मारली व ६० पैकी ६३ जागांवर विजय मिळवून २/३ बहुमत प्राप्त केले. मार्च २०१८ पासून भाजपचे बिपलब कुमार देब मुख्यमंत्रीपदावर आहेत.

यादी

[संपादन]
क्रम नाव कार्यकाळ[] राजकीय पक्ष
1 सचिंद्रलाल सिंह 1 जुलै 1963 1 नोव्हेंबर 1971 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
1 नोव्हेंबर 1971 20 मार्च 1972 N/A
2 सुखामोय सेन गुप्ता 20 मार्च 1972 31 मार्च 1977 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
3 प्रफुल्ल कुमार दास 1 एप्रिल 1977 25 जुलै 1977 काँग्रेस फॉर डेमॉक्रसी
4 राधिका रंजन गुप्ता 26 जुलै 1977 4 नोव्हेंबर 1977 जनता पक्ष
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
5 नोव्हेंबर 1977 5 जानेवारी 1978 N/A
5 नृपेन चक्रवर्ती 5 जानेवारी 1978 5 फेब्रुवारी 1988 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
6 सुधीर रंजन मजुमदार 5 फेब्रुवारी 1988 19 फेब्रुवारी 1992 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
7 समीर रंजन बर्मन 19 फेब्रुवारी 1992 10 मार्च 1993
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
11 मार्च 1993 10 एप्रिल 1993 N/A
8 दशरथ देव 10 एप्रिल 1993 11 मार्च 1998 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
9 माणिक सरकार 11 मार्च 1998 9 मार्च 2018
11 बिपलब कुमार देब 9 मार्च 2018 11 May 2022 भारतीय जनता पक्ष

टीपा

[संपादन]
  1. ^ a b c राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यमंत्रीमंडळ बरखास्त केले जाते. म्हणून मुख्यमंत्र्याचे पद रिकामे राहते. काही वेळा विधानसभा देखील बरखास्त केली जाऊ शकते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Former Chief Ministers of Tripura. Government of Tripura. Retrieved on 21 ऑगस्ट 2013.
  2. ^ अंबरीष दिवाणजी. "राष्ट्रपती राजवटीवरील माहिती". Rediff.com. 15 मार्च 2005.