Jump to content

व्ही. शांता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
V Shanta (es); ভি. শান্তা (bn); V Shanta (fr); V Shanta (ast); V Shanta (ca); व्ही. शांता (mr); V Shanta (de); ଭି ଶାନ୍ତା (or); V Shanta (ga); V Shanta (sl); V. Shanta (id); വി. ശാന്ത (ml); वि शान्ता (hi); వి. శాంత (te); ਵੀ. ਸ਼ਾਂਤਾ (pa); V Shanta (en); V Shanta (sq); ভি. শান্তা (as); வி. சாந்தா (ta) ভারতীয় কর্কটরোগ (ক্যান্সার) বিশেষজ্ঞ (bn); oncóloga india (ast); भारतीय कर्करोग तज्ज्ञ (mr); క్యాన్సర్ స్పెషలిస్ట్ మరియు అడియర్ కాన్సర్ ఇన్స్టిట్యూట్ ఛైర్పర్సన్ (te); କର୍କଟ ରୋଗ ବିଶେଷଜ୍ଞ (or); Indian cancer specialist (1927–2021) (en); ভাৰতীয় কৰ্কটৰোগ বিশেষজ্ঞ (as); कैंसर विशेषज्ञ और आद्यार कैंसर संस्थान के अध्यक्ष (hi); இந்திய புற்றுநோய் மருத்துவர், தமிழ்ப்பெண் மருத்துவர் (ta) Viswanathan Shanta (en)
व्ही. शांता 
भारतीय कर्करोग तज्ज्ञ
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमार्च ११, इ.स. १९२७
Mylapore
मृत्यू तारीखजानेवारी १९, इ.स. २०२१
चेन्नई
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Madras Medical College
  • Presidency College
व्यवसाय
  • oncologist
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विश्वनाथन शांता (११ मार्च १९२७ - १९ जानेवारी २०२१)[] एक भारतीय कर्करोग तज्ज्ञ आणि अद्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट, चेन्नईच्या अध्यक्षा होत्या. सर्व रुग्णांसाठी दर्जेदार आणि परवडणारे कर्करोग उपचार उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी त्या प्रसिद्ध आहे.[][] त्यांनी कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेणे,[] रोगाचा अभ्यास करणे, त्याचे प्रतिबंध आणि उपचार यावर संशोधन करणे, रोगाविषयी जागरुकता पसरवणे,[][] आणि कर्कार्बुदरोगशास्त्रच्या विविध उपविशेषतांमध्ये तज्ञ आणि शास्त्रज्ञ विकसित करणे या ध्येयासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले.[] त्यांच्या कामामुळे त्यांना मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, आणि पद्मविभूषण यासह अनेक पुरस्कार जिंकले आहे.

१९५५ पासून त्या अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटशी संबंधित होत्या आणि १९८० ते १९९७ दरम्यान संस्थेच्या संचालकांसह अनेक पदे त्यांनी भूषवली. त्यांनी विश्व स्वास्थ्य संस्थाच्या आरोग्य सल्लागार समितीसह आरोग्य आणि औषधांवरील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांच्या सदस्या म्हणून काम केले.[]

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

[संपादन]

शांताचा जन्म ११ मार्च १९२७ रोजी चेन्नईच्या मैलापूर येथे एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला ज्यात दोन नोबेल पारितोषिक विजेते: सी. व्ही. रमण (चुलत आजोबा) आणि एस. चंद्रसेकर (काका) यांचा समावेश आहे.[][] त्यांचे शालेय शिक्षण नॅशनल गर्ल्स हायस्कूल (आता लेडी शिवस्वामी अय्यर गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल) मधून झाले आणि वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले होते.[१०][११] त्यांनी प्रेसीडेंसी कॉलेजमध्ये पूर्व-वैद्यकीय अभ्यास केला आणि १९४९ मध्ये मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस, १९५२ मध्ये डीजीओ आणि १९५५ मध्ये एमडी (ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी) मिळवले.[१२][१३]

कारकीर्द

[संपादन]

डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी १९५४ मध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली तेव्हा शांता यांनी नुकतेच डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) पूर्ण केले होते. त्या लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या आणि त्यांची नियुक्ती महिला व बाल रुग्णालयात झाली होती. १९४० आणि १९५० च्या दशकात, वैद्यकीय व्यवसायात प्रवेश केलेल्या भारतीय महिलांनी सामान्यतः प्रसूती आणि स्त्रीरोग क्षेत्रात प्रवेश केला होता, परंतु शांता त्याऐवजी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सामील झाल्या.[१४]

संस्थेची सुरुवात एक लहान, १२ खाटांचे हॉस्पिटल, एकच इमारत, कमीत कमी उपकरणे आणि फक्त दोन डॉक्टर, शांता आणि कृष्णमूर्ती, अशी झाली. [] संस्थेने त्यांना दरमहा रु. २०० आणि आवारामध्ये राहण्याची सोय दिली. त्या १३ एप्रिल १९५५ा रोजी आवारामध्ये गेल्या आणि १९ जानेवारी २०२१रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत तिथेच राहिल्य [१२] [१५]

६० वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत, शांता यांनी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अनेक पदे भूषवली. त्या वैयक्तिकरित्या रूग्ण सेवेच्या गुणवत्तेबद्दल चिंतित होत्या आणि त्यांचा असा विश्वास होता की डॉक्टरांची भूमिका उपचारांच्या पलीकडे जाते आणि त्या भूमिकेसाठी रूग्णांची काळजी घेणे आवश्यक आहे. रूग्णांची काळजी घेणे आणि रोगाचा अभ्यास करण्याव्यतिरिक्त, त्यांनी संस्थेत तज्ञ आणि शास्त्रज्ञांचा समुह तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले.[१६] कर्करोगाचा लवकर शोध घेणे आणि या आजाराबद्दलची सार्वजनिक धारणा बदलण्याची गरज, विशेषतः या आजाराशी निगडीत अत्यंत भीती आणि निराशेची त्या पुरस्कर्ता होत्या.[१७] [१८]

शांता यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य सल्लागार समितीसह आरोग्य आणि औषधांवरील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांच्या सदस्या म्हणून काम केले. [] त्या तमिळनाडू राज्य आरोग्य योजना आयोगाच्या सदस्या होत्या. [१९]

पुरस्कार

[संपादन]
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, भारताचे राष्ट्रपती, २० मार्च २००६ रोजी नवी दिल्ली येथे शांता यांना पद्मभूषण प्रदान करताना.

शांता, नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या निवडून आलेल्या फेलो होत्या.[२०] त्यांना १९८६ मध्ये पद्मश्री पुरस्कार,[२१] २००६ मध्ये पद्मभूषण,[२२] २०१६ मध्ये पद्मविभूषण[] [२३] प्रदान झाले.[२४][२५]

त्यांना २००५ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला, [२६] आणि हा पुरस्कार त्यांनी त्यांच्या संस्थेला समर्पित केला. [२७]

मृत्यू

[संपादन]

शांता यांचे १९ जानेवारी २०२१ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आदल्या रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती आणि एका खाजगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. त्यांच्या हृदयात मोठ्या प्रमाणात अवरोध असल्याचे निदान झाले जे दुरुस्त करणे शक्य नव्हते.[२८] [१६]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Dr V Shanta, Cancer Institute chairwoman, dies in Chennai". द टाइम्स ऑफ इंडिया. 19 January 2021. 19 January 2021 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Dr. V. Shanta From Chennai Honoured With Padma Vibhushan For Her Service In The Field Of Cancer". Logical Indian. 13 April 2016. 2023-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 April 2016 रोजी पाहिले.
  3. ^ Padmanabhan, Geeta (24 September 2017). "Express yourself without fear: Dr. V. Shanta". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2 September 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Focus should be on early detection of cancer: Dr. V. Shanta". The Hindu (इंग्रजी भाषेत). 20 September 2016. ISSN 0971-751X. 3 May 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Early detection of cancer is key". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2 May 2019. ISSN 0971-751X. 3 May 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "Dr V Shanta (Columnist profile)". The Hindu (इंग्रजी भाषेत). 3 May 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Dr. V. Shanta – Chairman". www.cancerinstitutewia.in (इंग्रजी भाषेत). 2018-08-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 September 2018 रोजी पाहिले.
  8. ^ a b Divya Chandrababu (20 January 2021). "'To her, patients always came first': Cancer care pioneer dies at 93". Hindustan Times. 22 January 2021 रोजी पाहिले.
  9. ^ a b Umashanker, Sudha (5 March 2011). "She redefined the C word". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 8 August 2018 रोजी पाहिले.
  10. ^ Ganesh, Kamala (2021-01-29). "The making of an ethic of care: Dr. V. Shanta's journey". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2022-02-11 रोजी पाहिले.
  11. ^ Ramraj, Manasa (2015-01-19). "How Dr. Shanta, Grand Niece Of CV Raman, Is Making Cancer Care More Affordable In India". The Better India (इंग्रजी भाषेत). 2022-02-11 रोजी पाहिले.
  12. ^ a b "Dr V Shanta, chairperson of Adyar Cancer Institute, passes away in Chennai". NewsMinute. 19 January 2021. 19 January 2021 रोजी पाहिले.
  13. ^ Ronald Piana (25 January 2019). "Oncology Pioneer V. Shanta, MD, Has Long Championed Access to Quality Cancer Care". Ascopost. 19 January 2021 रोजी पाहिले.
  14. ^ V, Ganesan (August 26, 2005). "'An uphill task all along'". Frontline (इंग्रजी भाषेत). 2022-02-11 रोजी पाहिले.
  15. ^ Pushpa Narayan (20 January 2021). "Sprinkle my ashes all over the cancer institute: Last wish of Dr Shanta, who epitomised cancer care". द टाइम्स ऑफ इंडिया. 22 January 2021 रोजी पाहिले.
  16. ^ a b The Hindu Net Desk (19 January 2021). "V. Shanta (1927-2021)". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 23 January 2021 रोजी पाहिले.
  17. ^ "On cancer & terror". The Hindu (इंग्रजी भाषेत). 14 May 2010. ISSN 0971-751X. 3 May 2019 रोजी पाहिले.
  18. ^ "No parallel". The Hindu (इंग्रजी भाषेत). 28 February 2018. ISSN 0971-751X. 3 May 2019 रोजी पाहिले.
  19. ^ "Profile of Dr. V. Shanta". Government of Tamil Nadu, State Planning Commission. 2022-01-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 January 2021 रोजी पाहिले.
  20. ^ "List of Fellows — NAMS" (PDF). National Academy of Medical Sciences. 2016. 19 March 2016 रोजी पाहिले.
  21. ^ "Padma Awards for 1986 in the field of Medicine | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 August 2018 रोजी पाहिले.
  22. ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 2017-10-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
  23. ^ "Padma Vibhushan for Rajinikanth, Dhirubhai Ambani, Jagmohan". The Hindu. 25 January 2016. 25 January 2016 रोजी पाहिले.
  24. ^ "Padma Awards for the year 2016 | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 August 2018 रोजी पाहिले.
  25. ^ "Padma Awards list – 2016" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2016. 3 January 2016 रोजी पाहिले.
  26. ^ "Awardees from 2005 • The Ramon Magsaysay Award Foundation • Honoring greatness of spirit and transformative leadership in Asia". rmaward.asia (इंग्रजी भाषेत). 2018-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 August 2018 रोजी पाहिले.
  27. ^ "Shanta, V." Ramon Magsaysay Award Foundation. 25 September 2019 रोजी पाहिले.
  28. ^ "Dr. Shanta | Country loses a crusader who revolutionised cancer treatment". The Hindu (इंग्रजी भाषेत). 19 January 2021. ISSN 0971-751X. 21 January 2021 रोजी पाहिले.