आसामचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तरुण गोगोई २००१ ते २०१६ दरम्यान आसामच्या मुख्यमंत्रीपदावर होते.

आसामचा मुख्यमंत्री हा भारताच्या आसाम राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. आसाम विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

१९४६ सालापासून आजवर १५ व्यक्ती आसामच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. २०१६ सालच्या निवडणुकीत प्रथमच बहुमत मिळालेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते सर्बानंद सोनोवाल हे भाजपचे आसाममधील पहिले मुख्यमंत्री होते. मे २०२१ पासून भाजपचे हिमंता बिस्वा सरमा मुख्यमंत्रीपदावर आहेत.

यादी[संपादन]

क्रम नाव पदावरील काळ[१] कार्यकाळ पक्ष[a]
1 गोपीनाथ बोरदोलोई 11 फेब्रुवारी 1946 6 ऑगस्ट 1950 १,६३८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2 विष्णूराम मेधी 9 ऑगस्ट 1950 27 डिसेंबर 1957 २,६९८
3 विमलाप्रसाद चलिहा 28 डिसेंबर 1957 6 नोव्हेंबर 1970 ४,६९६
4 महेंद्रमोहन चौधरी 11 नोव्हेंबर 1970 30 जानेवारी 1972 ४४६
5 सरतचंद्र सिन्हा 31 जानेवारी 1972 12 मार्च 1978 २,२३२
6 गोलाप बोर्बोरा 12 मार्च 1978 4 सप्टेंबर 1979 542 जनता पक्ष
7 जोगेंद्रनाथ हजारिका 9 सप्टेंबर 1979 11 डिसेंबर 1979 94
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
12 डिसेंबर 1979 5 डिसेंबर 1980 ३५९ -
8 सईदा अन्वरा तैमूर 6 डिसेंबर 1980 30 जून 1981 207 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
30 जून 1981 13 जानेवारी 1982 197 -
9 केशवचंद्र गोगोई 13 जानेवारी 1982 19 मार्च 1982 66 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
19 मार्च 1982 27 फेब्रुवारी 1983 345 -
10 हितेश्वर सैकिया 27 फेब्रुवारी 1983 23 डिसेंबर 1985 १,०३१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
11 प्रफुलकुमार महंत 24 डिसेंबर 1985 28 नोव्हेंबर 1990 १,७९९ आसाम गण परिषद
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
28 नोव्हेंबर 1990 30 जून1991 214 -
12 हितेश्वर सैकिया [2] 30 जून1991 22 एप्रिल1996 १,७५७ [एकूण २,७८८] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
13 भूमिधर बर्मन 22 एप्रिल1996 14 मे 1996 23
प्रफुलकुमार महंत [2] 15 मे 1996 17 मे 2001 १,८२९ [एकूण ३,६२८] आसाम गण परिषद
14 तरुण गोगोई 17 मे 2001 २४ मे २०१६ ५,४७८ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
15 सर्बानंद सोनोवाल २४ मे २०१६ १० मे २०२१ १,८२० दिवस भारतीय जनता पक्ष
16 हिमंता बिस्वा सरमा १० मे २०२१ विद्यमान ८६८ दिवस

टीपा[संपादन]

  1. ^ येथे केवळ मुख्यमंत्र्याचा राजकीय पक्ष देण्यात आला आहे.
  2. ^ a b c d राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यमंत्रीमंडळ बरखास्त केले जाते. म्हणून मुख्यमंत्र्याचे पद रिकामे राहते. राज्याचे कामकाज केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालाद्वारे सांभाळले जाते. काही वेळा विधानसभा देखील बरखास्त केली जाऊ शकते.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Chief Ministers from the Assam Assembly website
  2. ^ अंबरीष दिवाणजी. "राष्ट्रपती राजवटीवरील माहिती". Rediff.com. 15 मार्च 2005.