आम आदमी पार्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आम आदमी पार्टीचा लोगो

आम आदमी पार्टी हा भारत देशातील एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष समाजसेवक अरविंद केजरीवाल व इतर समविचारी लोकांनी स्थापन केला.[१] भारतातील वाढता भ्रष्टाचार दूर करणे, जनलोकपाल विधेयक संसदेत पारित करणे, निवडणूक पद्धतीत सुधारण करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे या पक्षाचे मुख्य उद्देश आहेत.[२]

अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल ह्यांच्यामधील मतभेदानंतर केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाची अधिकृत घोषणा २६ नोव्हेंबर इ.स. २०१२, रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे करण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून लढणाऱ्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ६९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ह्यांपैकी २८ जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षाखालोखाल आम आदमी पक्षाने दुसऱा क्रमांक पटकावला. पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल ह्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांचा २२,००० मतांनी पराभव केला.

संदर्भ[संपादन]

  1. "केजरीवालांचा आम आदमी पक्ष", सकाळ, २५ नोव्हेंबर, २०१२. २७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. 
  2. आम आदमी पक्ष एजंडा. २७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]

आम आदमी पार्टीचे संकेतस्थळ