उत्तराखंडचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उत्तराखंडचा मुख्यमंत्री हा भारताच्या उत्तराखंड राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

नोव्हेंबर २००० मध्ये उत्तर प्रदेश राज्यामधून उत्तराखंड राज्य वेगळे करण्यात आले. तेव्हापासून आजवर ७ व्यक्ती उत्तरखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.

यादी[संपादन]

क्रम नाव पदावरील काळ कार्यकाळ पक्ष
1 नित्यानंद स्वामी 9 नोव्हेंबर 2000 29 ऑक्टोबर 2001 354 दिवस भारतीय जनता पक्ष
2 भगत सिंह कोश्यारी 30 ऑक्टोबर 2001 1 मार्च 2002 123 दिवस
3 नारायण दत्त तिवारी 2 मार्च 2002 7 मार्च 2007 1832 दिवस भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
4 भुवनचंद्र खंडुरी 8 मार्च 2007 23 जून 2009 839 दिवस भारतीय जनता पक्ष
5 रमेश पोखरियाल 24 जून 2009 10 सप्टेंबर 2011 808 Days
(4) भुवनचंद्र खंडुरी 11 सप्टेंबर 2011 13 मार्च 2012 185 दिवस
[एकूण 1024 दिवस]
6 विजय बहुगुणा 13 मार्च 2012 31 जानेवारी 2014 690 दिवस भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
7 हरीश रावत 1 फेब्रुवारी 2014 विद्यमान 2381 दिवस